Engalnd Team for Ashes: WTC Final नंतर होणाऱ्या ऍशेसच्या पहिल्या दोन मॅचसाठी इंग्लंड संघाची घोषणा, 16 खेळाडूंना संधी

आगामी ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली आहे.
England Team
England TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Engalnd Team for first Two Ashes Tests: इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील ऍशेस मालिका ही लोकप्रिय आहे. आता ही 5 कसोटी सामन्यांची ऍशेस मालिका कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर 16 जून पासून सुरू होणार आहे. कसोटी चॅम्पियनशीपचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान होणार आहे.

दरम्यान, ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी यजमान इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 16 जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघात 1 ते 3 जूनदरम्यान आयर्लंडविरुद्ध एकमेव कसोटीत खेळलेल्या सर्व खेळाडूंना ऍशेस मालिकेसाठीही इंग्लंड संघात स्थान दिले आहे.

England Team
Ashes Series: अ‍ॅशेस मालिकेपूर्वी इंग्लंडला दुसरा मोठा झटका, 'हा' धाकड गोलंदाज दुखापतग्रस्त

आयर्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलेल्या जोश टंगही त्याचे स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. त्याच्याशिवाय इंग्लंड संघात जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड हे अनुभवी वेगवान गोलंदाजही आहे.

तसेच ऑली रॉबिन्सन, मार्क वूड, मॅथ्यू पॉट्स, ख्रिस वोक्स यांचाही गोलंदाजी फळीत समावेश आहे. याशिवाय बेन स्टोक्सचाही पर्याय आहे, पण सध्या त्याच्या फिटनेसवर प्रश्व असल्याने तो गोलंदाजी कधी करु शकतो, याबद्दल अद्याप अस्पष्टता आहे. पण इंग्लंडचे प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने तो या ऍशेस मालिकेत गोलंदाजी कधीतरी गोलंदाजी करेल, असे म्हटले आहे.

तसेच ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी निवड झालेल्या इंग्लंड संघात यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोलाही संधी देण्यात आली आहे. याशिवाय झॅक क्रावली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स हे फलंदाजही आहेत. त्यांच्या साथीला अनुभवी जो रुट संघात आहे.

England Team
अभिमानास्पद! Ashes मालिकेत 'हा' भारतीय निभावणार महत्वाची भूमिका, इंग्लंडमध्ये रंगणार थरार...

ऍशेस मालिकेतील पहिला सामना 16 जूनला एजबस्टन येथे सुरु होणार आहे. त्यानंतर दुसरा सामना 28 जूनपासून लॉर्ड्सला होईल.

ऍशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी इंग्लंड संघ -

  • बेन स्टोक्स (कर्णधार), ऑली पोप, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), जो रुट, जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रुक, जॅक लीच, बेन डकेट, झॅक क्रावली, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, डॅन लॉरेन्स, ख्रिस वोक्स, मार्क वूड, जोश टंग.

ऍशेस मालिका 2023 (इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया)

  • 16 - 20 जून - पहिली कसोटी - एजबस्टन

  • 28 जून - 2 जुलै - दुसरी कसोटी - लॉर्ड्स

  • 6 - 10 जुलै - तिसरी कसोटी - हेडिंग्ले

  • 19 - 23 जुलै - चौथी कसोटी - ओल्ड ट्रॅफोर्ड

  • 27 - 31 जुलै - पाचवी कसोटी - द ओव्हल

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com