India vs Australia: ऑस्ट्रेलियाला जबरदस्त धक्का! WTC Final मधून 'हा' स्टार खेळाडू बाहेर

भारताविरुद्ध 7 जूनपासून सुरू होणाऱ्या टेस्ट चॅम्पियनशीप फायनल सामन्यातून ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू बाहेर झाला आहे.
Australia Test Team
Australia Test TeamTwitter
Published on
Updated on

Josh Hazlewood ruled out: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 7 जूनपासून कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामना लंडनमधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. पण या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड या अंतिम सामन्यातून बाहेर झाला आहे. तो सध्या टाचेच्या वरच्या बाजूच्या आणि कबंरेच्या एका बाजूच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्याच दुखापतीमुळे त्याला या अंतिम सामन्यातून बाहेर व्हावे लागले आहे. त्याच्याऐवजी मायकल नेसरला ऑस्ट्रेलिया संघात संधी देण्यात आली आहे.

हेजलवूड गेल्या काही महिन्यांपासून टाचेच्या वरच्या बाजूच्या दुखापतीचा सामना करत आहे. तसेच त्याला नुकतीच इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळताना डाव्या बाजूला वेदना जाणवल्या होत्या. पण तो कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यापर्यंत तंदुरुस्त होईल अशी ऑस्ट्रेलिया अपेक्षा होती.

मात्र, अद्याप त्याच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह असल्याने ऑस्ट्रेलियाने जोखीम न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Australia Test Team
Test Championship Format: भारत-ऑस्ट्रेलिया संघात होणार फायनल! पण WTC स्पर्धा खेळवली जाते तरी कशी?

नेसर चांगल्या फॉर्ममध्ये

हेजलवूडच्या जागेवर ऑस्ट्रेलियाच्या 15 जणांच्या संघात निवड झालेला अष्टपैलू नेसर चांगल्या फॉर्ममध्ये आहे. कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्यासाठी नेसरचा बदली खेळाडू म्हणून समावेश करण्यासाठी स्पर्धेच्या तांत्रिक समीतीनेही परवानगी दिली आहे. त्यामुळे त्याला आता अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी मिळण्याची शक्यता आहे.

34 वर्षीय नेसर नुकताच इंग्लंडमध्ये काउंटी चॅम्पियनशीपमध्ये ग्लॅमॉर्गन संघासाठी खेळला आहे. या संघाकडून खेळताना त्याने 5 सामन्यांमध्ये 19 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याने एक शतकही ससेक्सविरुद्ध केले होते. त्याचबरोबर वूस्टरशायरविरुद्ध 86 आणि लीसेस्टरशायरविरुद्ध 90 धावांची खेळी केली होती.

Australia Test Team
Engalnd Team for Ashes: WTC Final नंतर होणाऱ्या ऍशेसच्या पहिल्या दोन मॅचसाठी इंग्लंड संघाची घोषणा, 16 खेळाडूंना संधी

नेसरने आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाकडून दोन कसोटी सामनेच खेळले आहेत. या 2 सामन्यांमध्ये त्याने 7 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाला आशा आहे की कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्यानंतर १६ जूनपासून सुरु होणाऱ्या ऍशेस मालिकेसाठी हेजलवूड पूर्ण तंदुरुस्त होईल.

  • कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ - पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅब्युशेन, नॅथन लायन, टॉड मर्फी, मायकेल नेसर, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर

    राखीव खेळाडू: मिचेल मार्श, मॅथ्यू रेनशॉ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com