

Goa Pet Policy : एका वर्षापूर्वी राज्य सरकारने हिंसक श्वान प्रतिबंध धोरण जाहीर केले होते. या धोरणाअंतर्गत हिंसक कुत्र्यांची नोंदणी करणे व लसीकरणाचा अंतर्भाव होता; पण हे धोरण केवळ कागदावरच असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली नसल्याची माहिती पशुसंवर्धन व पशु वैद्यकीय सेवा संचालनालयातील अधिकाऱ्यांनी दिली.
पिटबुल व रॉटविलरसारख्या कुत्र्यांची नोंदणी व लसीकरण करण्यास सांगितले होते. या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. तरी गोव्यात नोंदणी व लसीकरण सुरू झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गत फेब्रुवारी महिन्यात सरकारने नोंदणी बंधनकारक करण्याचे जाहीर केले होते. तेव्हा सरकारने लसीकरणाबरोबर त्यांचे प्रजनन टाळण्यास सांगितले होते. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने दुरुस्ती करून कुत्र्यांच्या क्रूर प्रकारांचाही समावेश करण्यात आला. त्याचबरोबर जबाबदारी व दायित्व विद्यमान मालकांवर टाकण्यात आले होते.
त्यानंतर विधानसभेत गोवा पशुसंवर्धन व पाळीव प्राणी पालन विधेयक मंजूर करून पूर्वीच्या कायद्याला बळकटी देण्यात आली. हिंसक कुत्र्यांच्या मालकीचे नियमन करणे व कुणावरही हल्ला केल्यास मालकाने नुकसानभरपाई देणे यासारखी तरतूद करण्यात आली होती. मात्र, अजून या कायद्याचे पालन करण्यासाठीची तयारी व अंमलबजावणी होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कुत्र्यांची नोंदणी ऑनलाईन
कुत्र्यांची नोंदणी करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर टाकण्यात आली आहे. मात्र, प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नगरपालिका प्रशासन सध्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे कुत्रा मालकांना ऑनलाईन पद्धतीने आपल्या कुत्र्याची नोंदणी करणे सुलभ होईल, असे या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.