ICC Women's Rankings: वनडे क्रमवारीत स्मृती मानधनाला मोठा फायदा, हरमनप्रीत कौरची आठव्या स्थानावर घसरण

Smriti Mandhana: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) महिला एकदिवसीय क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचली आहे, तर कर्णधार हरमनप्रीत कौर आठव्या स्थानावर घसरली आहे.
Smriti Mandhana & Harmanpreet Kaur
Smriti Mandhana & Harmanpreet KaurDainik Gomantak
Published on
Updated on

ICC Women's Rankings: भारताची स्टार सलामीवीर स्मृती मानधना मंगळवारी जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) महिला एकदिवसीय क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचली आहे, तर कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आठव्या स्थानावर घसरली आहे.

मानधनाचे 704 रेटिंग गुण आहेत तर हरमनप्रीतचे 702 रेटिंग गुण आहेत. भारतीय कर्णधाराची दोन अंकानी घसरण झाली आहे.

दरम्यान, डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाड टॉप-10 गोलंदाजांच्या यादीत एकमेव भारतीय आहे. त्याचप्रमाणे अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दीप्ती शर्मा ही एकमेव भारतीय खेळाडू टॉप-10 मध्ये आहे. या दोन्ही खेळाडूंच्या क्रमवारीत मात्र प्रत्येकी एका अंकाची घसरण झाली आहे. गायकवाड नवव्या तर अष्टपैलू दीप्ती सातव्या स्थानावर आहे.

Smriti Mandhana & Harmanpreet Kaur
ICC Women ODI Rankings: मिताली राजला मोठा धक्का, तर झूलन गोस्वामीचे 'बल्ले-बल्ले'

दुसरीकडे, श्रीलंकेचा चमारी अटापट्टू केवळ दोन आठवडेच फलंदाजांच्या वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी राहिली. ऑस्ट्रेलियाची बेथ मून पुन्हा अव्वल स्थानी पोहोचली. मुनीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये नाबाद 81 आणि 30 धावा केल्या होत्या.

तिच्यापाठोपाठ इंग्लंडची (England) नॅट सायव्हर ब्रंट आहे, जिने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 763 रेटिंगसह दोन अंकाची झेप घेत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. ती अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. या एपिसोडमध्ये तिने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग (402) मिळवले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com