ICC Rankings: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ऍशेस मालिका संपल्यानंतर कसोटी खेळाडूंची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. बुधवारी जाहीर झालेल्या या क्रमवारीत इंग्लंडचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज जो रुटला एका अंकाचा फायदा झाला आहे.
न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसनची बादशाहत धोक्यात आली आहे. रुट आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
विल्यमसन दुखापतीमुळे बराच काळ मैदानापासून दूर आहे. रुटचे 559 रेटिंग गुण आहेत, तर विल्यमसन 883 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) पाच सामन्यांच्या ऍशेस मालिकेत रुटने 405 धावा काढल्या. गेल्या सामन्यात त्याने 91 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली होती.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लॅबुशेनला (826 गुण) क्रमवारीत मोठा फटका बसला आहे. तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर स्टीव्ह स्मिथने (842 गुण) तीन अंकाची प्रगती करत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
त्याचबरोबर, सलामीवीर उस्मान ख्वाजा सातव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो 17 व्या स्थानावर तर सलामीवीर जॅक क्रॉली 29 व्या स्थानावर आहे.
टॉप-10 कसोटी फलंदाजांमध्ये भारताचा (India) एकमेव खेळाडू कर्णधार रोहित शर्मा 759 गुणांसह 10 व्या क्रमांकावर कायम आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (829 गुण) चौथ्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन (879 गुण) अव्वल स्थानावर कायम आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड ( 776 गुण) चौथ्या क्रमांकावर आहे.
ब्रॉडने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ओव्हल कसोटी हा त्याचा शेवटचा सामना होता. ऍशेसमध्ये त्याने 22 विकेट घेतल्या. इंग्लंडच्या मार्क वूडने कारकिर्दीतील हाय रेटिंग प्राप्त केली आहे.
ऍशेसमधील दमदार कामगिरीचा फायदा ख्रिस वोक्सला देखील झाला. वोक्स आणि मिचेल स्टार्क यांना संयुक्तपणे मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले. स्टार्क दोन अंकाची प्रगती करत 12व्या स्थानावर पोहोचले आहे.
त्याचबरोबर, एकदिवसीय क्रमवारीत फारसा बदल झालेला नाही. मात्र, भारताचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने मात्र मोठी झेप घेतली आहे.
तो आता 45व्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याने तीन शानदार अर्धशतके झळकावली.
मालिकेत तो 'प्लेयर ऑफ द सीरीज' ठरला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सलग तीन अर्धशतके झळकावणारा इशान हा सहावा भारतीय खेळाडू आहे.
तर फिरकीपटू कुलदीप यादवने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार प्रदर्शन केल्यामुळे वनडे गोलंदाजांच्या यादीत आठ अंकाची प्रगती करत 14व्या क्रमांकावर पोहोचला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.