Team India Test Record: स्वातंत्र्यदिनी क्रिकेट जगतात भारताचा डंका! टीम इंडियानं रचला नवा इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला जगातील तिसराच देश

India 600th Test Match vs Sri Lanka Galle: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीला आज (15 ऑगस्ट) गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरुवात झाली.
Team India Test Record
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Team India 600 Test Matches Milestone History: भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीला आज (15 ऑगस्ट) गाले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरुवात झाली. हा सामना भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एका सुवर्ण अध्यायासारखा ठरला, कारण हा भारतीय संघाचा कसोटी क्रिकेटमधील तब्बल 600 वा सामना आहे. या ऐतिहासिक सामन्यात मैदानात उतरताच भारताने 600 किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळणारा जगातील तिसरा देश बनण्याचा महापराक्रम केला. भारतापूर्वी फक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोनच देशांनी हा टप्पा पार केला.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याचा जागतिक विक्रम क्रिकेटचा जनक मानल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या नावावर आहे. हजाराहून अधिक कसोटी सामने खेळणारा इंग्लंड हा जगातील एकमेव संघ असून त्यांनी आतापर्यंत 1097 सामने खेळले आहेत. यामध्ये इंग्लंडने 405 सामने जिंकले, 336 सामने गमावले तर 356 सामने अनिर्णित राहिले. या यादीत दुसऱ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा संघ असून त्यांनी 883 कसोटी सामने खेळले आहेत. कांगारुंच्या संघाने अप्रतिम कामगिरी करत 426 सामन्यांत विजय मिळवला, तर 235 सामन्यांत पराभव पत्करला असून 219 सामने ड्रॉ राहिले आहेत.

आता या दिग्गज देशांच्या पंक्तीत भारताने (India) 600 व्या कसोटी सामन्यासह आपले स्थान पक्के केले. या 600 व्या ऐतिहासिक सामन्यापूर्वी खेळल्या गेलेल्या 599 कसोटी सामन्यांपैकी भारताने 186 सामन्यांत विजय मिळवला, तर 188 सामने गमावले आणि 224 सामने अनिर्णित राहिले. भारतापाठोपाठ वेस्ट इंडीजचा संघही 600 कसोटींचा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर असून त्यांनी आतापर्यंत 596 सामने खेळले आहेत. याशिवाय न्यूझीलंड (487), दक्षिण आफ्रिका (479) आणि पाकिस्तान (471) यांनी 450 पेक्षा जास्त सामने खेळले असून श्रीलंकेने आतापर्यंत 329 सामने खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com