World Cup 2023: क्विंटन डी कॉकचा पुण्यात झंझावात, ठोकले चौथे 'शतक'; हिट मॅनच्या रेकॉर्डपासून...

Quinton De Kock Centuries: दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे.
Quinton De Kock
Quinton De Kock Dainik Gomantak
Published on
Updated on

World Cup 2023, Quinton De Kock Centuries: दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत एकूण चार शतके झळकावली आहेत.

बुधवारी न्यूझीलंडविरुद्धही डी कॉकने शतक झळकावले आणि उत्कृष्ट खेळी खेळली. त्याचे भारतीय भूमीवरील हे सहावे शतक होते. यासह, त्याने विश्वचषकाच्या (World Cup) एकाच आवृत्तीत सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कुमार संगकाराची बरोबरी केली आहे.

रोहित शर्माच्या विक्रमापासून एक पाऊल दूर

दरम्यान, क्विंटन डी कॉकने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत चार शतके झळकावली आहेत. त्याचवेळी, या स्पर्धेच्या एकाच मोसमात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तो आता केवळ रोहित शर्माच्या मागे आहे. उर्वरित सामन्यांमध्ये त्याने आणखी एक शतक झळकावल्यास तो रोहित शर्माच्या पाच शतकांची बरोबरी करेल.

दक्षिण आफ्रिका (South Africa) आपला 7वा सामना खेळत आहे. त्याला अजून लीग टप्प्यात दोन सामने खेळायचे आहेत. मग जर संघ उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरीत पोहोचला तर त्याला तिथेही दोन सामने खेळावे लागतील. अशा स्थितीत आता डी कॉकचा फॉर्म पाहता तो रोहितचा विक्रम मोडू शकेल असे वाटते.

Quinton De Kock
World Cup 2023: न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू ठरला 'बेस्ट फील्डर'; किंग कोहलीला सोडले मागे

एकदिवसीय विश्वचषकाच्या एका मोसमात सर्वाधिक शतके

रोहित शर्मा- 5 (2019 विश्वचषक)

कुमार संगकारा- 4 (2015 विश्वचषक)

क्विंटन डी कॉक- 4 (2023 विश्वचषक)

सौरव गांगुली- 3 (2003 विश्वचषक)

मॅथ्यू हेडन- 3 (2007 विश्वचषक)

मार्क वॉ - 3 (1996 विश्वचषक)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com