ICC Men Player Of The Month: 'या' 23 वर्षीय स्टार फलंदाजाने बाबर आझमला मागे टाकत मिळवला ICC चा हा पुरस्कार!

ICC Men Player Of The Month: आयसीसीने 2023 च्या मे महिन्यासाठी प्लेयर ऑफ द मंथचा विजेता घोषित केला आहे.
Babar Azam
Babar AzamDainik Gomantak
Published on
Updated on

ICC Men Player Of The Month: आयसीसीने 2023 च्या मे महिन्यासाठी प्लेयर ऑफ द मंथचा विजेता घोषित केला आहे. आयर्लंडच्या हॅरी टेक्टरने मे महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि बांगलादेशचा नजमुल हसन शांतो यांना मागे टाकत त्याने हा मोठा पुरस्कार मिळवला आहे. त्याबद्दल जाणून घेऊया...

या खेळाडूला मोठा पुरस्कार मिळाला

बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत हॅरी टेक्टरने चमकदार कामगिरी केली. त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) मालिकेत 23 वर्षीय स्टार फलंदाजाने आपणच आयर्लंड संघाचे भविष्य असल्याचे दाखवून दिले.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने 22 धावा केल्या. यानंतर, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने शानदार शतक झळकावले आणि 140 धावांची खेळी खेळली. तर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 45 धावा केल्या.

Babar Azam
गिलसह भारत-ऑस्ट्रेलिया संघावरही ICC ची मोठी कारवाई, WTC 2023 Final मधील 'या' चूका भोवल्या

टेक्टरने हे निवेदन दिले

पुरस्कार मिळवल्यानंतर हॅरी टेक्टरने सांगितले की, 'पुरस्कार जिंकून मला खूप आनंद होत आहे. ज्यांनी मला व्होट दिले त्यांचे आभार मानू इच्छितो. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्यामुळे हा पुरस्कार आयर्लंड संघाच्या उत्कृष्ट कामगिरीचे प्रतिबिंब आहे. हेन्रिक मलान, अँड्र्यू बालबर्नी, प्रशिक्षक आणि खेळाडूंच्या पाठिंब्याशिवाय हा पुरस्कार जिंकणे कठीण झाले असते.'

Babar Azam
WTC 2023 Final: विजेता ऑस्ट्रेलिया मालामाल! ICC कडून भारतासह 'या' 9 संघांनाही कोट्यवधींची बक्षीसं

विश्वचषक पात्रता फेरी लवकरच सुरु होणार

महिला खेळाडू लॉरा डेलेनी आणि एमियर रिचर्डसन यांनीही आयर्लंडसाठी प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार मिळवला आहे.

त्याचवेळी, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच आयर्लंडच्या पुरुष खेळाडूने प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार मिळवला आहे. विश्वचषक 2023 साठी पात्रता फेरी काही दिवसांनंतर सुरु होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com