मॅच फिक्सिंग रॅकेटचा पर्दाफाश! ICC ने 6 जणांना केले निलंबित; 3 भारतीयांचाही समावेश

ICC Match Fixing Racket Exposed: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मॅच फिक्सिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
ICC Match Fixing Racket Exposed
ICC Match Fixing Racket ExposedDainik Gomantak

ICC Match Fixing Racket Exposed: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मॅच फिक्सिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 2021 एमिरेट्स टी-10 लीग दरम्यान अनेक खेळाडू, अधिकारी आणि काही भारतीय संघ मालकांवर भ्रष्ट कारवायांमध्ये गुंतल्याबद्दल गंभीर आरोप झाले आहेत.

हे आरोप अबू धाबी T10 लीगशी संबंधित आहेत. ही स्पर्धा 19 नोव्हेंबर 2021 ते 4 डिसेंबर 2021 दरम्यान झाली होती. या स्पर्धेत सहा संघ सहभागी झाले होते.

दरम्यान, आरोपींमध्ये पराग संघवी आणि कृष्ण कुमार या दोन भारतीय सहमालकांचा समावेश आहे. हे दोघेही पुणे डेव्हिल्स संघाचे सहमालक आहेत. या दोघांशिवाय, त्यांचा एक खेळाडू, बांगलादेशचा (Bangladesh) माजी कसोटीपटू नासिर हुसेन याच्यावरही लीगमधील भ्रष्टाचारविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

ICC Match Fixing Racket Exposed
ODI Ranking: भारताचा विजय, ऑस्ट्रेलियाचा पराभव, फायदा मात्र पाकिस्तानचा! ICC ची वनडे क्रमवारी जाहीर

स्पर्धेतील सामने फिक्स करण्याचा प्रयत्न

भ्रष्ट कारवायांमध्ये गुंतलेला तिसरा भारतीय फलंदाजी प्रशिक्षक सनी धिल्लन आहे. आयसीसीच्या म्हणण्यानुसार, 2021 अबू धाबी टी-10 क्रिकेट लीगमधील सामने फिक्स केल्याचा आरोप आहे.

या स्पर्धेसाठी एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने (ECB) आयसीसीची नियुक्ती लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी (DACO) म्हणून केली होती.

दरम्यान, हे आरोप ईसीबीकडूनच जारी केले जात आहेत. पराग संघवीवर सामन्याचा निकाल आणि इतर बाबींवर सट्टा लावल्याचा आणि तपास यंत्रणेला सहकार्य न केल्याचा आरोप आहे. याशिवाय, कृष्ण कुमारवर DACO पासून गोष्टी लपवल्याचा आरोप आहे, तर धिल्लनवर सामना फिक्स करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

ICC Match Fixing Racket Exposed
World Cup 2023: पंच अन् रेफ्रींची ICC ने केली घोषणा, जवागल श्रीनाथसह भारताच्या दोघांना संधी

नसीरवर गिफ्टची माहिती जाहीर न केल्याचा आरोप

त्याचवेळी, बांगलादेशसाठी 19 कसोटी आणि 65 एकदिवसीय सामने खेळलेल्या नासिर हुसेनवर DACO ला $750 पेक्षा जास्त किमतीच्या गिफ्टची माहिती न दिल्याचा आरोप आहे.

निलंबित करण्यात आलेल्या इतरांमध्ये फलंदाजी प्रशिक्षक अझहर झैदी, संघ व्यवस्थापक शादाब अहमद आणि यूएईचे (UAE) देशांतर्गत खेळाडू रिझवान जावेद, सलिया समन यांचा समावेश आहे.

आरोपांना उत्तर देण्यासाठी 19 दिवसांचा अवधी मिळाला

तीन भारतीयांसह एकूण सहा जणांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. या सर्वांना आरोपांची उत्तरे देण्यासाठी 19 सप्टेंबरपासून 19 दिवसांचा अवधी असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com