सामन्याच्या काही तास आधी सुरक्षेच्या कारणावरुन न्यूझीलंडचा पाक दौरा स्थगित
न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने (New Zealand Cricket Board) पाकिस्तानातील (Pakistan) सुरक्षेच्या कारणास्तव (security reasons) सुरु असलेला पाकिस्तान दौरा स्थगित (Postponed) केला आहे. न्यूझीलंड विरुध्द पाकिस्तान यांच्यात पहिला एकदिवसीय सामना काही तासांमध्येच सुरु होणार होता. परंतु त्या आधीच न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने हा दौरा सुरक्षेच्या कारणास्तव स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वीच कोरोनाच्या कारणाने भारताने इंग्लंड विरुध्दच्या पाचव्या कसोटीतून सामना सुरु होण्याच्या काही तास आधी माघार घेतली होती. त्याचीच पुर्नरावृत्ती आता न्यूझीलंडकडून करण्यात आली असून त्यांनी पाकिस्तानातील सुरक्षेच्या कारणास्तव दौरा स्थगित केला आहे. विशेष म्हणजे सामना सुरु होणार खेळाडू मैदानात उतरणार त्या आधीच ही बातमी आल्याने क्रिकेट शौकीनांच्या भुवया उंचावल्या आहेत.
न्यूझीलंडचा संघ पाकिस्तान सोबत तीन एक दिवसीय आणि पाच टी- 20 सामने या दौऱ्यात खेळणार होता. सामन्या पूर्वी पत्रकार परिषद देखील होऊन दोन्ही कर्णधारांचे फोटो सेशनही करण्यात आले, त्यानंतर दोन्ही संघांनी सराव देखील केला. परंतु दुसऱ्या दिवशी सामना सुरु होण्याआधीच अचानक हा दौरा रद्द करण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले. एका रात्रीत असे काय घडले ज्याने न्यूझीलंडने पाकिस्तनच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत दौरा रद्द केला. रात्रीत असा काय संदेश आला, त्यामुळे न्युझीलंड बोर्डासमोर या खेरीज दुसरा पर्याय उरला नाही. न्यूझीलंड बोर्डाने म्हणले आहे की, खेळाडुंच्या सुरक्षेशिवाय इतर गोष्टीला आम्ही महत्त्व देत नाही. त्यामुळे हा दौरा रद्द करीत आहोत. असे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड व्हाईट (David White) यांनी सांगितले. न्यूझीलंड क्रिकेट संघटनेचे प्रमुख हिथ मिल्स यांनी देखील न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे समर्थन करत खेळाडूंची सुरक्षा केव्हाही महत्त्वाची असल्याचे सांगितले.
न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने घेतलेला हा निर्णय एकतर्फी निर्णय आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी न्यूझीलंड क्रिकेट मंडळाशी संवाद साधून त्यांना सुरक्षेची खात्री दिली. पाहुण्या संघाच्या सुरक्षेबाबत कुठलीही कमतरता ठेवली जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी न्यूझीलंड क्रिकेट मंडळाला दिला तरीही दौरा रद्द झाल आहे. या दौऱ्यावर येण्यापूर्वी न्यूझीलंडच्या सुरक्षा पथकाने पाकिस्तानातील सुरक्षा व्यवस्थेची पहाणी करत समाधान व्यक्त केले होते. त्यामुळेच हा दौरा निश्चित झाला. आम्ही अजूनही मालिका चालू ठेवण्यासाठी तयार आहोत. पण, न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचा न खेळण्याचा निर्णय ठाम आहे, असे पाक क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.