भविष्याचा विचार करत BCCIने केएल राहुलला उपकर्णधार करावे : सुनील गावसकर

राहुल (KL Rahul) भारतीय संघाचा (Indian team) कर्णधार होऊ शकतो. त्याने चांगले काम केले आहे, आताही इंग्लंडमध्ये त्याची फलंदाजी खूप चांगली होती. आयपीएल आणि एकदिवसीय क्रिकेटमध्येही तो चांगली कामगिरी करत आहे.
केएल राहुलकडे (KL Rahul) भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जाऊ शकते.
केएल राहुलकडे (KL Rahul) भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जाऊ शकते. Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) भविष्याचा विचार करायला हवा. अशा स्थितीत पुढचा कर्णधार आतापासूनच तयार केला पाहिजे. केएल राहुलकडे (KL Rahul) भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जाऊ शकते. असे मत माजी भारतीय कर्णधार फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी व्यत केले आहे.

केएल राहुलकडे (KL Rahul) भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिले जाऊ शकते.
Rohit Sharmaचे उपकर्णधारपद विराटला काढून घ्यायचे होते

केएल राहुलची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करा

बीसीसीआयने राहुलला सध्या भारताचा उपकर्णधार बनवावा अशी गावसकरांची इच्छा आहे. कर्णधार विराट कोहलीने गुरुवारी घोषणा केली की पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या ICC टी -20 विश्वचषकानंतर तो टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सोडेल, त्यानंतर भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा कर्णधाराची भूमिका पार पाडेल. रोहित सध्या मर्यादित षटकांच्या खेळात भारताचा उपकर्णधार आहे. त्याला जर कर्णधार बनवले तर उपकर्णधाराची जागाही रिक्त होईल.

सुनील गावसकर एका मीडिया हाऊसशी बोलताना म्हणाले, "ही चांगली गोष्ट आहे की बीसीसीआय पुढचा विचार करीत आहे, कारण ते महत्त्वाचे आहे. जर भारताला नवीन कर्णधाराची तयारी करायची असेल तर राहुल भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो. त्याने चांगले काम केले आहे, आताही इंग्लंडमध्ये त्याची फलंदाजी खूप चांगली होती. आयपीएल आणि एकदिवसीय क्रिकेटमध्येही तो चांगली कामगिरी करत आहे. त्याला उपकर्णधार बनविले जाऊ शकेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com