IPLला टशन देण्यासाठी पाकिस्तानने केले न्यूझीलंडसोबतच्या मालिकेचे आयोजन

न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यातील मालिकेला 17 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यात तिन्ही एकदिवसीय सामने रावळपिंडीमध्ये होतील. तर 25 सप्टेंबरपासून 5 टी-20 सामन्यांची मालिका लाहोरमध्ये खेळविण्यात येईल.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानने - न्यूझीलंडसोबत वन डे आणि टी-20 मालिकेचे आयोजन केले आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानने - न्यूझीलंडसोबत वन डे आणि टी-20 मालिकेचे आयोजन केले आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्ताना क्रिकेट बोर्डने (PCB) बीसीसीआयला (BCCI) पुन्हा एकदा टशन देण्याचा प्रयत्न केला असून, उर्वरित आयपीएलच्या काळातच सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानने - (Pakistan) न्यूझीलंडसोबत (New Zealand) वन डे आणि टी-20 मालिकेचे आयोजन (Organizing ODI and T20 series) केले आहे. या दोन्ही संघात सुरुवातीला तीन एकदिवसीय सामने आणि त्यानंतर 5 टी-20 सामन्यांची मालिकेचे आयोजन पीसीबीने केले आहे. त्याच कालावधीमध्ये आयपीएलचे (IPL) उर्वरित सामने देखील युएईमध्ये होणार आहेत. पण या मालिकेमुळे आता न्यूझीलंडच्या खेळाडूंचा आयपीएलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानने - न्यूझीलंडसोबत वन डे आणि टी-20 मालिकेचे आयोजन केले आहे.
IPL 2021: 'या' 4 देशांनी दिली उर्वरित आयपीएल घेण्याची ऑफर

न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यातील मालिकेला 17 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यात तिन्ही एकदिवसीय सामने रावळपिंडीमध्ये होतील. तर 25 सप्टेंबरपासून 5 टी-20 सामन्यांची मालिका लाहोरमध्ये खेळविण्यात येईल. 18 वर्षानंतर न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात असल्याने ही मालिका पाकसाठी खास आहे.

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानने - न्यूझीलंडसोबत वन डे आणि टी-20 मालिकेचे आयोजन केले आहे.
उर्वरित आयपीएल सामने आणि टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये? 

पाकिस्तानचा आयपीएलला टशन देण्याचा प्रयत्न नाकाम

दुसरीकडे बीसीसीआयने कोरोनामुळे भारतात अर्धावट राहिलेल्या आयपीएलचे आयोजन याच कालावधीत केले आहे. उर्वरित आयपीएलला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार असून याचा अंतिम सामना 15 ऑक्टोबरला होणार आहे. आयपीएलच्या वेळेतच न्यूझीलंडचा-पाकिस्तान दौरा असल्याने आयपीएलच्या संघमालकांना याचा फटका बसू शकतो. मुंबई इंडियन्स, हैदराबाद सनराईझर्स आणि कोलकता नाईट राईडर्स या संघात न्यूझीलंडचे अनेक खेळाडू असल्याने या संघ मालकांच्या चिंता वाढली आहे. परंतु न्यूझीलंड क्रिकेटचे प्रमुख डेविड व्हाइट यांनी या दौऱ्यातून न्यूझीलंडच्या अनेक प्रमुख खेळाडूंना दूर ठेवले आहे. यामध्ये कप्तान केन विल्यमसन, जेम्स नीशम, आणि लॉकी फर्ग्यूसन यांच्यासह एडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट, मिशेल सैंटनर, टिम सीफर्ट, फिन एलन, काइल जैमीसन हे आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे आयपीएलला टशन देण्यासाठी पाकिस्तानकडून आयोजित करण्यात आलेल्या या मालिकेत न्यूझीलंडचे हे प्रमुख खेळाडू सहभागी होणार नसल्याने पाकिस्तानच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com