Hockey5s World Cup: उपविजेत्या भारतीय महिलांना हॉकी इंडियाकडून बक्षीसाची घोषणा, फायनलमध्ये नेदरलँड्सकडून झालेला पराभव

India Women Hockey Team: हॉकी 5s महिला वर्ल्डकप स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या भारतीय महिला संघासाठी हॉकी इंडियाने बक्षीसाची घोषणा केली आहे.
India Hockey Women Team
India Hockey Women TeamX/TheHockeyIndia

Hockey India announces cash award India Women Team for clinching Silver medal in Hockey5s World Cup 2024

शनिवारी (27 जानेवारी) एफआयएच हॉकी 5s महिला वर्ल्डकप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. अंतिम सामन्यात भारत आणि नेदरलँड्स यांचे महिला संघ आमने सामने होते. या अंतिम सामन्यात भारतीय संघाला 2-7 अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का बसला.

त्यामुळे नेदरलँड्सने हॉकी 5s महिला वर्ल्डकपवर नाव कोरले, तर भारतीय महिला संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पण भारतीय संघाने या सामन्यात दाखवलेल्या शानदार कामगिरीसाठी हॉकी इंडियाने प्रत्येक खेळाडूसाठी ३ लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्यांसाठी 1.5 लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे.

India Hockey Women Team
Hockey 5s Asia Cup: भारतीय महिला संघाने जिंकला आशिया कप, वर्ल्डकपचं तिकिटंही केलं पक्कं

अंतिम सामन्यात भारताचा पराभव

अंतिम सामन्यात भारताकडून ज्योती छेत्री आणि ऋतुरा दादासाहेब पिसाळ यांनाच गोल करता आले होते. तसेच नेदरलँड्सकडून जानेक वॅन दे वेन्ने, बेंटे व्हॅन डर वेल्डट, लाना कालसे आणि सोशा बेनिंन्गा यांनी गोल केले.

खंरतर नेदरलँड्सने पहिल्याच हाफमध्ये भारतावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली होती. पहिल्या 5 मिनिटातच त्यांच्याकडून दोन गोल झाले. त्यानंतरही सातत्याने नेदरलँड्सने आक्रमण चालू ठेवले होते.

बेंटेने 8 मिनिटाला तिसरा आणि लाना कालसेने 11 व्या मिनिटाला चौथा गोल केला. त्यानंतर सोशाने 13 व्या मिनिटाला, तर जानेकने 14 व्या मिनिटाला अचूक निशाणा साधला. त्यामुळे नेदरलँड्सने पहिल्याच हाफमध्ये 6-0 अशा आघाडी घेतलेली. नेदरँलड्सच्या आक्रमणापुढे भारताला पहिल्या हाफमध्ये गोलची संधीच मिळाली नाही.

India Hockey Women Team
Hockey Jr. World Cup: टीम इंडियाचे पदक हुकले! स्पेनने पराभवाचा धक्का देत तिसऱ्या क्रमांकावर केला कब्जा

मात्र दुसऱ्या हाफच्या पाच मिनिटांनंतर ज्योतीने भारतासाठी पहिला गोल नोंदवला, त्यापाठोपाठ ऋतुजाने दुसरा गोल करत भारताच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र लानाने 27 व्या मिनिटाला पुन्हा आणखी एक गोल करत नेदरलँड्सची आघाडी आणखी भक्कम केली.

दुसऱ्या हाफमध्ये भारताने सातत्याने गोलचे प्रयत्न केले पण नेदरलँड्सची गोलकिपर किकी गुन्नेमन हिने चांगला बचाव केला. अखेरच्या मिनिटालाही नेदरलँड्सला पेनल्टी स्ट्रोक मिळाला होता. पण भारताने त्यावर गोल होऊ दिला नाही. अखेर या सामन्यात भारताला 7-2 असा पराभव स्विकारावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com