Indian Women’s Team won Hockey 5s Asia Cup and Qualify for World Cup Oman 2024:
भारतीय महिला हॉकी संघाने सोमवारी पहिला हॉकी 5s आशिया चषक जिंकत इतिहास रचला आहे. या विजयाबरोबरच भारतीय महिला संघ ओमानमध्ये होणाऱ्या 2024 महिला हॉकी वर्ल्डकप 5s स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. या विजयानंतर भारतीय संघासाठी रोख बक्षीसाची घोषणाही करण्यात आली.
सोमवारी भारतीय महिला संघाने आशिया कप २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात थायलंडला ७-२ अशा फरकाने पराभूत केले. भारतीय संघाकडून मारियाना कुजूर (2', 8'), मोनिका डीपी टोप्पो (7'), ज्योती (10', 27'), नवज्योत कौर (23'), आणि महिमा चौधरी (29') यांनी गोल केले. तसेच थायलंडकडून कुंजिरा इंपा (5') आणि सांपोंग कॉर्गनॉक (5') यांनी गोल केले.
पहिल्या हाफमध्ये भारताने आक्रमक सुरुवात केली होती. पहिल्या हाफमध्ये मारियाना कुजूरने दुसऱ्याच मिनिटाला मैदानी गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. पण लगेचच 5 व्या मिनिटाला थायलंडकडून कुंजिरा इंपा आणि सांपोंग कॉर्गनॉक यांनी गोल करत थायलंडला आघाडीवर आणले.
यानंतर मात्र, भारताने थायलंडला गोलची संधी दिली नाही. भारताकडून 7 व्या मिनिटाला मोनिका डीपी टोप्पोने गोल करत लगेचच बरोबरी साधली. त्याच्या पुढच्याच मिनिटाला कुजूरच्या गोलने भारतीय संघ पुन्हा आघाडीवर आला.
पहिला हाफ संपण्यासाठी 4 मिनिटे बाकी असताना ज्योतीने 10 व्या मिनिटाला गोल साकारला. त्यामुळे पहिल्या हाफ संपला, तेव्हा भारतीय संघ 4-2 अशा आघाडीवर होता.
दुसऱ्या हाफमध्येही भारतीय संघाने आपली लय कायम ठेवली. कर्णधार नवज्योत कौरने 23 व्या मिनिटाला भारतासाठी पाचवा गोल नोंदवला. त्यानंतर ज्यातीने 27 आणि महिमा चौधरीने 29 व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी मजबूत केली. त्यामुळे भारताने हा सामना सहज जिंकला.
भारतीय संघाच्या शानदार कामगिरीबद्दल हॉकी इंडियाने प्रत्येक खेळाडूला 2 लाख रुपयांचे आणि सपोर्ट स्टाफ सदस्यांसाठी 1 लाख रुपये बक्षीसाची घोषणा केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.