Joe Root made history
Joe Root made history Dainik Gomantak

Joe Root ने रचला इतिहास; इंग्लंडसाठी असे करणारा पहिला फलंदाज ठरला

न्यूझीलंड विरुद्ध लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा 5 विकेट्सनी विजय झाला.
Published on

न्यूझीलंड विरुद्ध लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा 5 विकेट्सनी विजय झाला. तर त्यामध्ये जो रूट (Joe Root) इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला, ज्याने इंग्लंडच्या दुसऱ्या डावात नाबाद 115 धावा करून संघाला विजय मिळवून दिला, रूटने 115 धावांच्या खेळीत 170 धावा केल्या आहेत. सामन्यामध्ये त्याने 12 चौकार मारले. (Joe Root made History)

Joe Root made history
इरफान पठाणने अर्शदीप सिंगचे केले कौतुक म्हणाला...

रूटला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देखील देण्यात आला. यादरम्यान रूट कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करण्यात यशस्वी ठरला, तर कसोटीमध्ये 10,000 धावा करणारा तो जगातील 14 वा खेळाडू ठरला आहे. याशिवाय रुट हा या टप्प्यावर पोहोचणारा इंग्लंडचा दुसरा खेळाडू ठरला, रुटच्या आधी अॅलिस्टर कुकने कसोटी सामन्यामध्ये 10,000 धावा केल्या आहेत.

याशिवाय रूटने ऐतिहासिक असा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून 17 हजार धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. माजी कर्णधाराने कुकचाच विक्रम मोडीस काढला. कूकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून एकूण 15737 धावा केल्या आहेत, म्हणजेच जो रुट हा इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासात 17 हजार धावांचा टप्पा गाठणारा पहिला इंग्लिश फलंदाज ठरला.

रुटने कसोटीत 10015 धावा केल्या तर, एकदिवसीय सामन्यात 6109 धावा आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 893 धावा केल्या आहेत, म्हणजेच रुटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 17017 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 41 आंतरराष्ट्रीय शतकांचा देखील समावेश आहे.

Joe Root made history
दिनेश कार्तिक धोनीसारखा फिनिशर: रवी शास्त्री

तसे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यामध्ये सचिन तेंडुलकरचे नाव आहे. तेंडुलकरने 34357 धावा केल्या आहेत तर, दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी दिग्गज कुमार संगकारा आहे, संगकाराने 28016 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावरती आहे तर पाँटिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27483 धावा केल्या आहेत. भारताचा विराट कोहली या बाबतीत 7 व्या क्रमांकावरती आहे. विराटने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 23650 धावा केल्या आहेत. तसेच राहुल द्रविड सहाव्या क्रमांकावरती आहे, द्रविडने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 24208 धावा केल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com