दिनेश कार्तिक धोनीसारखा फिनिशर: रवी शास्त्री

महेंद्रसिंग धोनीने या स्पर्धेत जी भूमिका बजावली तीच भूमिका दिनेश कार्तिक निभावू शकतो
Dinesh Karthik
Dinesh Karthik Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

भारतीय विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकसाठी आयपीएल 2022 हंगाम चांगला होता. या मोसमात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) साठी फिनिशरची भूमिका बजावली. याशिवाय या फलंदाजाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ला अनेक वेळा कठीण परिस्थितीतून बाहेर काढले.या वर्षी टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियात खेळवला जाणार आहे. (Ravi Shastri On Dinesh Karthik)

या हंगामात दिनेश कार्तिकचा स्ट्राइक रेट 183.33 होता. त्याने या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) साठी 16 सामन्यात 330 धावा केल्या. या नेत्रदीपक कामगिरीनंतर त्याचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 जून रोजी दिल्लीतील फिरोजशाह कोटला स्टेडियमवर होणार आहे.

Dinesh Karthik
टीम इंडियाचा गब्बर मुलाला भेटून झाला भावूक, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

'दिनेश कार्तिकसाठी दक्षिण आफ्रिका मालिका चांगली संधी'

दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-20 मालिका ही दिनेश कार्तिकसाठी चांगली संधी असल्याचे मत माजी भारतीय क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. या मालिकेत दिनेश कार्तिकने चांगली कामगिरी केल्यास आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात त्याचा समावेश होऊ शकतो. दिनेश कार्तिक हा अनुभवी खेळाडू आहे. ही मालिका त्याच्यासाठी भारतीय संघातील स्थान पक्की करण्याची उत्तम संधी आहे, असे शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषकाबाबत माजी भारतीय प्रशिक्षक म्हणाले की, 'महेंद्रसिंग धोनीने या स्पर्धेत जी भूमिका बजावली तीच भूमिका दिनेश कार्तिक निभावू शकतो.'

Dinesh Karthik
Ukraine Football League: युक्रेनमध्ये फुटबॉल लीग पुन्हा सुरू करण्याची योजना

'महेंद्रसिंग धोनीसारखा फिनिशर'

जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा तुम्हाला संघाच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. संघाच्या गरजेनुसार तुम्हाला स्वतःला साचेबद्ध करावे लागेल. आता यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक वरच्या फळीत फलंदाजी करणार की खालच्या फळीत फिनिशरची भूमिका बजावणार हे संघाला ठरवावे लागेल. यष्टिरक्षक म्हणून महेंद्रसिंग धोनीसारख्या खेळाडूची गरज आहे, ज्याच्याकडे कीपिंग व्यतिरिक्त चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे. या संघात आधीच ऋषभ पंतसारखा खेळाडू आहे, जो टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजी करेल. त्यामुळे खालच्या क्रमवारीत देखील चांगल्या फिनिशरची गरज आहे, असे रवी शास्त्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
India Wins By 124 Runs in Asian Games
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com