ऑस्ट्रेलियन दिग्गज आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल ने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला "क्रिकेटमधील सर्वात चलाख " असे संबोधले आहे. ते म्हणाले की त्याची निर्णय घेण्याची क्षमता ही त्याच्या समकालीन क्रिकेट खेळाडूंपेक्षा वेगळी आहे. चॅपल हे 2005 ते 2007 पर्यंत भारतीय संघाचे(Indian Cricket Team) प्रशिक्षक होते पण त्यांचा कार्यकाळ हा वादांनीच घेरला होता. भारताला टी-20 आणि एकदिवसीय विश्वचषक जिंकून देणाऱ्या धोनीचे त्यांनी कौतुक केले आहे.
चॅपल यांनी ईएसपीएनक्रिकइन्फो (ESPNcricinfo) मधील त्यांच्या स्तंभात लिहिले की, "क्रिकेटमध्ये विकसित झालेल्या देशांनी खेळाचे नैसर्गिक वातावरण गमावले आहे, जो त्यांच्या विकासाच्या संरचनेचा एक मोठा भाग होता. ते म्हणाले, "भारतीय उपखंडात अशी अनेक शहरे आहेत जिथे कोचिंग सुविधा या नगण्य आहेत. तेथिल तरुण हा कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय रस्त्यावर किंवा मोकळ्या मैदानात खेळतात. तर याच ठिकाणी त्यांच्या सध्याच्या अनेक स्टार खेळाडूंनी क्रिकेटचे कौशल्य आत्मसात केले."
त्यातीलच एक म्हणजे झारखंडमधील (Jharkhand) रांची शहरातील महेंद्रसिंग धोनी(MS Dhoni). यावेळी चॅपेल म्हणाले की, "एमएस धोनी, ज्याच्यासोबत मी भारतात काम केले आहे, हे एका फलंदाजाचे उत्तम उदाहरण आहे. ज्याने आपली प्रतिभा विकसित केली आणि खेळायला शिकले." तसेच ते पुढे म्हणाले की, "धोनीने विविध खेळपट्ट्यांवर अधिक अनुभवी खेळाडूंविरुद्ध खेळताना आपली निर्णयक्षमता आणि धोरणात्मक कौशल्ये विकसित केली आहेत, जी त्याला त्याच्या समकालीन क्रिकेटपटू पासून वेगळी आहे. मी जेवढ्या क्रिकेटपटूंना (Cricket) भेटलो त्या सर्व क्रिकेटपैकी धोनी हा सर्वात तेज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.