रवींद्र जडेजा भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करेल असे सध्या तरी वाटत नाही. टी-20 विश्वचषकापासून भारतीय संघाबाहेर असलेला हा खेळाडू अद्यापही पूर्णपणे तंदुरुस्त झाला नाही. रवींद्र जडेजाच्या उजव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे तो क्रिकेट च्या मैदानापासून दूर आहे. यामुळेच रवींद्र जडेजा न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळू शकला नाही. तर दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिके साठी सुध्दा तो तयार नव्हता. आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे आणि टी-20 मालिकेत सामन्यात सुध्दा रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) खेळताना दिसणार नसल्याचे वृत्त आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, रवींद्र जडेजा अजूनही तंदुरुस्त आहे. तो अजूनही पूर्णपणे फिट नाही. फेब्रुवारी महीण्याच्या शेवट खेळल्या जाणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या (Sri Lanka)देशांतर्गत कसोटी मालिकेतन तो पुनरागमन करू शकतो. जर यदाकदाचित तो या मालिकेतही खेळला नाही तर रवींद्र जडेजा हा थेट क्रिकेटच्या मैदानात आयपीएल (Ipl) 2022 मध्ये खेळतांना दिसणार आहे. रवींद्र जडेजा हा आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक भाग आहे आणि असे मानले जात आहे की, तो पुढचा कर्णधार होऊ शकतो.
विंडीजचा संघ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येईल
कोलकाता (Kolkata)येथे 16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान वेस्ट इंडिज विरुद्ध (West Indies)तीन टी-20 सामने खेळले जाणार आहेत. मात्र याआधी 6 ते 9 फेब्रुवारीदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका अहमदाबादमध्ये होणार आहे. जर भारत-वेस्ट इंडिज मालिकेसाठी टीम इंडियामध्ये रवींद्र जडेजाची निवड नाही झाली तर, त्या ऐवजी अक्षर पटेल किंवा कृणाल पटेलसारख्या खेळाडूंची निवड केल्या जाऊ शकते.
वेस्ट इंडिज मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा एक-दोन दिवसांतच होणार आहे. आवेश खान आणि हर्षल पटेल या वेगवान गोलंदाजांना वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी मिळू शकते. या आधी त्यांची निवड न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठीही झाली होती.
अश्विन-भुवी बाहेर
वेस्ट इंडिज मालिकेदरम्यान भुवनेश्वर कुमार व आर अश्विन या खेळाडूंची निवड होणार नसल्याची चर्चा आहे. कारण आर अश्विन हा जखमी झाल्याचे बोलले जात आहे. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान तो वेदनाविरोधी इंजेक्शन घेऊन खेळत असल्याचे वृत्त आले होते. तर भुवीची अलीकडची कामगिरी ही, विश्वासार्ह नाही. त्यामुळे त्याला टीम इंडिया (India acricket Team) बाहेर काढले जाऊ शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.