Ranaji Trophy: गोव्याला सचिनचा 'अर्जुन' बळ देणार का? शतक करण्याची नामी संधी

गोवा संघ राजस्थानशी भिडला
Ranaji Trophy
Ranaji TrophyDainik Gomantak
Published on
Updated on

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा राजस्थानविरुद्ध सामना आजपासून (ता. 13) पर्वरी येथे सुरु झाला. यात ग्रेट क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. आजच्या सामन्यात गोवा संघ राजस्थानशी भिडला. दरम्यान अर्जुन तेंडुलकरकडे शतक झळकावून स्वत:ला सिद्ध करत, संघाला बळ देण्याची सुवर्णसंधी आहे.

(golden opportunity for arjun to score a century sachins presence at the crease to save goas team in ranji trophy)

Ranaji Trophy
IND vs BAN: टीम इंडियाला मोठा झटका, व्हिसा न मिळाल्याने 'हा' मॅच विनर अजूनही भारतातच!

पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत गोव्याच्या संघाने 215 धावांवर 5 विकेट गमावल्या आहेत. मध्येच अडकलेला संघ पाहून अर्जुनला 7 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरावे लागले. अर्जुनने फक्त 12 चेंडूंचा सामना केला आहे आणि तो 4 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर नाबाद राहून क्रीजवर उभा आहे. दीड दिवसाचा खेळ संपेपर्यंत अर्जुनकडे पूर्ण वेळ शिल्लक आहे. तो या वेळेचा सदुपयोग करून शतक झळकावू शकतो. यासोबतच संघ चांगल्या आणि मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतो.

Ranaji Trophy
KL Rahul-Athiya Shetty Marriage: के. एल. राहुल अथियासोबत नव्या इनिंगसाठी सज्ज... 'ही' तारीख निश्चित्त

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये गोवा संघासाठी फलंदाजीची संधी मिळाली नाही, परंतु त्याने गोलंदाजीतील कामगिरीने गोवा संघाला आनंद दिला. अर्जुनने त्रिपुराविरुद्ध फक्त तीन षटके टाकली. मात्र, अर्जुनला तीन षटकांच्या स्पेलमध्ये एकही बळी घेता आला नाही.

पण अर्जुनने धावा अत्यंत वाईट पद्धतीने खर्च केल्या. त्याचबरोबर अर्जुनचा हा रणजी ट्रॉफीमधील गोवा संघासाठी पदार्पण सामना आहे. त्यामुळे गोव्याची सर्व काही आता अर्जुनच्या हातात असून त्याला स्वत: देखील सिद्ध करता येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com