IND vs BAN: टीम इंडियाला मोठा झटका, व्हिसा न मिळाल्याने 'हा' मॅच विनर अजूनही भारतातच!

India vs Bangladesh: या खेळाडूला नुकतेच संघात स्थान देण्यात आले होते, मात्र आता हा खेळाडू पहिल्या कसोटीतून जवळपास बाहेर पडल्याचे मानले जात आहे.
Team India
Team India Dainik Gomantak

India vs Bangladesh 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील (BAN vs IND) चितगावच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर होणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. व्हिसा न मिळाल्याने संघातील एक खेळाडू अद्याप बांगलादेशला पोहोचू शकलेला नाही. या खेळाडूला नुकतेच संघात स्थान देण्यात आले होते, मात्र आता हा खेळाडू पहिल्या कसोटीतून जवळपास बाहेर पडल्याचे मानले जात आहे.

टीम इंडियाला मोठा धक्का

16 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता उभय संघांमधील सामना सुरु होईल. 31 वर्षीय वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट (Jaydev Unadkat) या सामन्यासाठी तयार नाही. क्रिकबझच्या वृत्तानुसार, उनाडकट अद्याप बांगलादेशला पोहोचलेला नाही. 12 वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणारा सौराष्ट्राचा हा वेगवान गोलंदाज अजूनही भारतातच अडकला आहे. उनाडकट अजूनही राजकोटमध्ये घरीच असल्याचे समजते.

Team India
IND vs BAN, 1st Test: पंत असताना पुजारा उपकर्णधार, केएल राहुल म्हणतोय, 'मला माहित नाही...'

त्यामुळे व्हिसाला विलंब होत आहे

BCCI त्या सर्व खेळाडूंसाठी व्हिसाची व्यवस्था करते, ज्यांना निवडीसाठी समाविष्ट केले जाऊ शकते. मात्र जयदेव उनाडकटच्या बाबतीत, मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) दुखापतीनंतर त्याची निवड झाल्यामुळे प्री-बुकिंग करण्यात आले नव्हते. खांद्याच्या दुखापतीमुळे शमी या मालिकेचा भाग होऊ शकला नाही.

Team India
IND vs BAN: बांगलादेशला दिवसा तारे दाखवण्यास पंत सज्ज! आस्मानी फटकेबाजी करताना Video Viral

देशांतर्गत क्रिकेटच्या बळावर स्थान मिळाले

31 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने त्याची एकमेव कसोटी 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन येथे खेळली होती. त्याने सात वनडे आणि 10 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये 10 सामन्यांत 19 बळी घेऊन तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. या शानदार कामगिरीनंतरच त्याचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. यासोबतच जयदेवने 96 सामन्यांच्या कारकिर्दीत 353 विकेट्स घेतल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com