Ranji trophy : गोव्याने उधळले कर्नाटकचे मनसुबे

सामना अनिर्णित : सुयश प्रभुदेसाईचे दुसऱ्या डावातही अर्धशतक
Suyash Prabhudesai
Suyash Prabhudesai Dainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटकने पहिल्या डावात सहाशे धावा केल्या, पण गोव्याच्या चिवट प्रतिकारामुळे त्यांना निर्विवाद विजय मिळवता आला नाही. मनसुबे उधळले गेल्यामुळे रणजी क्रिकेट स्पर्धेतील अनिर्णित लढतीतून त्यांना डावातील आघाडीच्या तीन गुणांवर समाधान मानावे लागले.

चार दिवसीय सामना पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर झाला. कर्नाटकच्या 7 बाद 603 घोषित धावसंख्येला उत्तर देताना गोव्याने तिसऱ्या दिवसअखेरच्या 8 बाद 321 धावा केल्या होत्या. शुक्रवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळी गोव्याचा डाव 373 धावांत संपुष्टात आला. 230 धावांच्या पिछाडीमुळे कर्नाटकने गोव्यावर फॉलोऑन लादला. सुयश प्रभुदेसाई (नाबाद 61) याच्या सलग दुसऱ्या अर्धशतकामुळे गोव्याने चहापानाच्या ठोक्याला 3 बाद 150 धावा केल्या. त्यावेळी दोन्ही कर्णधारांच्या संमतीने निर्णय शक्य नसल्यामुळे पंचांनी खेळ थांबवला. यावेळी गोव्याचा संघ 80 धावांनी मागे होता. कर्नाटकचा पहिल्या डावातील नाबाद द्विशतकवीर मनीष पांडे सामन्याचा मानकरी ठरला.

Suyash Prabhudesai
Football legend Pele Passed Away: भारताच्या माजी कर्णधाराने पेले यांच्या आठवणींना दिला उजाळा

कर्नाटकचे आता तीन लढतीत एक विजय व दोन अनिर्णित निकालामुळे 13 गुण झाले आहेत. गोव्याचा हा सलग तिसरा अनिर्णित सामना ठरला. त्यांना एक गुण मिळाला. त्यांचे आता पाच गुण झाले आहेत. स्पर्धेची पुढील फेरी तीन जानेवारीपासून खेळली जाईल. कर्नाटक बंगळूर येथे छत्तीसगडविरुद्ध खेळेल, तर गोव्याचा संघ केरळविरुद्ध खेळण्यासाठी त्रिवेंद्रम येथे जाईल.

दर्शनचे शतक हुकले

गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ याचे पाचवे रणजी शतक अवघ्या पाच धावांनी हुकले. पहिल्या डावात त्याने व लक्षयने (38) नवव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली. फिरकी गोलंदाज शुभांग हेगडेने लक्षयला स्लिपमध्ये झेलबाद केल्यानंतर लगेच मध्यमगती वैशाख याच्या गोलंदाजीवर दर्शनने मिडविकेटला झेल दिला व गोव्याचा डाव संपला. डावखुऱ्या दर्शनने 172 चेंडूंत १५ चौकार व एका षटकाराच्या मदतीने 95 धावा केल्या. ``माझे शतक हुकल्याची सल आहेच, पण संघाला फॉलोऑनपासून वाचवू शकलो नाही याची जास्त खंत आहे. कर्नाटकविरुद्ध सामना अनिर्णित राखला यास मी आमचा नैतिक विजय मानणार नाही आमचा संघ चांगले क्रिकेट खेळत आहे. पुढील लढतीत आणखी चांगल्या कामगिरीसह विजयासाठी प्रयत्न करू,`` असे दर्शनने सामन्यानंतर सांगितले.

Suyash Prabhudesai
Mahadayi Water Disputes: कर्नाटकचा अहवाल पंतप्रधानांनी न फेटाळल्यास मुख्यमंत्री राजीनामा देतील ?

मयांकने केले गोव्याचे कौतुक

सामन्यानंतर गोव्याच्या प्रतिकाराचे कर्नाटकचा कर्णधार मयांक अगरवाल याने कौतुक केले. तो म्हणाला, ``आम्ही कोणालाही कमी लेखले नव्हते, गोव्याचा संघ खरोखरच चांगला आहे. त्यांनी तुल्यबळ लढत दिली, `` कर्नाटकचा वेगवान गोलंदाज रोनित मोरे तिसऱ्या दिवशी जायबंदी झाला, त्याची अनुपस्थिती सामन्याच्या शेवटच्या दिवशी जाणवल्याचेही मयांकने मान्य केले.

सुमीरनने पुन्हा संयम गमावला

पर्वरी येथे राजस्थानविरुद्ध अगोदरच्या लढतीत बाद दिल्यानंतर अखिलाडूवृत्ती प्रदर्शित केल्याबद्दल सामनाधिकाऱ्यांनी गोव्याच्या सुमीरन आमोणकर याच्यावर कारवाई करताना सामना मानधनातील ३० टक्के रक्कम कापली होती. सलामीचा हा फलंदाज शुक्रवारीही संयम गमावून बसला. पुन्हा एकदा त्याने अशोभनीय वर्तन केले. त्यामुळे यावेळी कारवाई अंतर्गत त्याला २५ टक्के सामना मानधनास मुकावे लागले.

संक्षिप्त धावफलक

कर्नाटक, पहिला डाव : 7 बाद 603 घोषित.

गोवा, पहिला डाव (8 बाद 321 वरून) : 121.5 षटकांत सर्वबाद 373 (दर्शन मिसाळ 95, लक्षय गर्ग 38, फेलिक्स आलेमाव नाबाद 0, के. गौतम 3-140, वाय. वैशाख 3-60, शुभांग हेगडे 3-80), दुसरा डाव : 45 षटकांत 3 बाद 150 (अमोघ देसाई 25, सुमीरन आमोणकर 26, सुयश प्रभुदेसाई नाबाद 61, स्नेहल कवठणकर 21, दर्शन मिसाळ नाबाद 10).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com