Ranji Cricket: पर्वरीत उद्यापासून गोवा विरूद्ध कर्नाटक रणजी क्रिकेट सामना

कर्नाटकचे पारडे जड; गोव्याकडून कडवा प्रतिकार अपेक्षित
Ranji Trophy
Ranji Trophy Dainik Gomantak

Ranji Cricket: माजी विजेत्या कर्नाटकचा संघ कागदावर बलाढ्य दिसतो, त्यांच्यापाशी कर्णधार मयांक अगरवाल, मनीषा पांडे आदी नावाजलेले खेळाडू आहेत, तरीही रणजी करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याकडून कडवा प्रतिकार अपेक्षित आहे.

स्पर्धेतील चार दिवसीय सामना मंगळवारपासून (ता. 27) पर्वरी येथील जीसीए अकादमी मैदानावर खेळला जाईल. दोन्ही संघ प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. कर्नाटकचे विजय व बरोबरी अशा कामगिरीसह 10, तर गोव्याचे दोन अनिर्णित लढतीतून चार गुण आहेत. सोमवारी सकाळच्या सत्रात गोव्याने, तर दुपारच्या सत्रात कर्नाटकने कसून सराव केला. गोव्याचे प्रशिक्षक मन्सूर अली खान हे कर्नाटकचे माजी रणजीपटू आहेत.

Ranji Trophy
Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' तळपला! 2022 वर्षात रोहित-विराटसारखे महारथीही पडले मागे

यजमान संघात एक बदल शक्य

राजस्थानविरुद्ध गोव्याने अनिर्णित लढतीत पहिल्या डावात आघाडी घेतली होती. त्या लढतीत तीन मध्यमगती गोलंदाज यजमानांनी खेळविले. जमशेदपूरच्या कीनन स्टेडियमची खेळपट्टी फिरकीला साथ देणारी असल्याने झारखंडविरुद्ध गोव्याने तीन फिरकी गोलंदाज खेळविताना शुभम देसाईला पदार्पणाची संधी दिली. आता पुन्हा पर्वरीत सामना होत असल्याने गोव्याचा संघ तीन मध्यमगती गोलंदाज खेळविण्याचे संकेत आहेत. या जागेसाठी फेलिक्स आलेमाव व ऋत्विक नाईक यांच्यात चुरस असेल. झारखंडविरुद्ध दुसऱ्या डावात गोलंदाजी न केलेला डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर कर्नाटकविरुद्धच्या लढतीसाठी सज्ज असल्याचे सांगण्यात आले.

दीर्घ काळानंतर उभय संघांत सामना

गोवा आणि कर्नाटक यांच्यात दीर्घ कालावधीनंतर रणजी करंडक सामना होत आहे. 21 वर्षांपूर्वी त्यांच्यात सामना झाला होता. 25 ते 28 डिसेंबर 2001 या कालावधीत बंगळूर येथे झालेल्या लढतीत कर्नाटकने गोव्याला 9 विकेट राखून हरविले होते. आतापर्यंत उभय संघांत 17 रणजी सामने झाले असून कर्नाटकने 13 विजय नोंदविले आहेत. गोव्याने फक्त 1 सामना जिंकला असून 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.

Ranji Trophy
Team India: बांगलादेशविरुद्ध कसोटी तर जिंकली, पण टीम इंडियासमोर उभे राहिलेत 'हे' यक्षप्रश्न

दोन्ही संघ

गोवा ः दर्शन मिसाळ (कर्णधार), सिद्धेश लाड (उपकर्णधार), अमोघ देसाई, सुमीरन आमोणकर, ईशान गडेकर, सुयश प्रभुदेसाई, स्नेहल कवठणकर, समर दुभाषी, एकनाथ केरकर, लक्षय गर्ग, अर्जुन तेंडुलकर, ऋत्विक नाईक, फेलिक्स आलेमाव, मोहित रेडकर, दीपराज गावकर, शुभम देसाई, प्रशिक्षक ः मन्सूर अली खान.

कर्नाटक संघ ः मयांक अगरवाल (कर्णधार), आर. समर्थ (उपकर्णधार), निकिन जोस, विशाल ओनात, मनीष पांडे, केव्ही सिद्धार्थ, बीआर शरथ, शरथ श्रीनिवास, के. गौतम, श्रेयस गोपाळ, रोनित मोरे, व्ही. कौशिक, विद्वथ कव्हेरप्पा, व्ही. वैशाक, शुभांग हेगडे, मुख्य प्रशिक्षक ः पीव्ही शशिकांत.

यंदा रणजी करंडक स्पर्धेत

कर्नाटक

- विरुद्ध सेनादल – अनिर्णित लढतीत आघाडीचे 3 गुण

- विरुद्ध पुदुचेरी – डाव व 7 धावांनी जिंकल्यामुळे 7 गुण (दोन्ही सामने बंगळूर येथे)

गोवा

- विरुद्ध राजस्थान – पर्वरीत अनिर्णित लढतीत आघाडीमुळे 3 गुण

- जमशेदपूर येथे झारखंडविरुद्ध अनिर्णित लढतीत पहिल्या डावात पिछाडीमुळे 1 गुण

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com