Goa: संघ दिवसभरात दोन वेळा गारद

सपशेल नमते : कुचबिहार क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचा दुसऱ्याच दिवशी डावाने विजय
मनीष काकोडे
मनीष काकोडेDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: महाराष्ट्राच्या (Maharashtra) प्रभावी गोलंदाजीचा सामना करणे गोव्याच्या फलंदाजांना अजिबात जमले नाही, त्यांनी दिवसभरात दोन वेळा सपशेल नमते घेतले. त्यामुळे 19 वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट (cricket) स्पर्धेतील चार दिवसीय सामन्यात गोव्याला दुसऱ्याच दिवशी डावाने पराभव पत्करावा लागला.

गुजरातमधील (Gujarat) सूरत येथील खोलवाड जिमखाना मैदानावर एलिट क गट चार दिवसीय सामना मंगळवारी दुसऱ्या दिवशी संपला. महाराष्ट्राने डाव व 64 धावांनी विजय मिळवून एकूण सात गुणांची कमाई केली. गोव्याचा पुढील सामना सहा डिसेंबरपासून तमिळनाडूविरुद्ध सूरत येथे खेळला जाईल.

महाराष्ट्राने काल सामन्याच्या पहिल्या दिवशी सर्वबाद 287 धावा केल्या होत्या. गोव्याने दिवसअखेर बिनबाद 9 धावा केल्या होत्या. मात्र आज सकाळी तिलक जाधव (6-42) याच्या भेदक गोलंदाजीसमोर गोव्याची दाणादाण उडाली. त्यांचा पहिला डाव अवघ्या 88 धावांत संपुष्टात आला. फॉलोऑनची नामुष्की आल्यानंतरही गोव्याची दुसऱ्या डावातही घसरगुंडी उडाली व डाव 134 धावांत संपुष्टात आला. या डावात महाराष्ट्राच्या ए. निषाद याने 48 धावांत 5 गडी बाद केले. दोन्ही डावात मिळून गोव्याने 65.2 षटके फलंदाजी केली आणि फक्त तिघाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली.

मनीष काकोडे
Goa: तनिशाला मिश्र दुहेरीत रौप्यपदक

मनीषचा प्रतिहल्ला

नवव्या क्रमांकावरील फलंदाज मनीष काकोडे याने महाराष्ट्राच्या गोलंदाजांवर प्रतिहल्ला चढवत झुंजार अर्धशतक नोंदविल्यामुळे गोव्याला दुसऱ्या डावात सव्वाशे धावा पार केल्याचे समाधान मानले. मनीषने 54 चेंडूंत 54 धावा करताना 10 चौकार व १ षटकार मारला. याशिवाय सलामीच्या देवनकुमार चित्तम याने 59 चेंडूंत 7 चौकारांच्या मदतीने 43 धावा केल्या. गोव्याच्या पहिल्या डावातही मनीष यानेच सर्वाधिक धावा नाबाद 28 धावा केल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक महाराष्ट्र, पहिला डाव : सर्वबाद 287

गोवा, पहिला डाव: 31.4 षटकांत सर्वबाद 88 (देवनकुमार चित्तम 23 , सनथ नेवगी 8 , इझान शेख 0 , कौशल हट्टंगडी 20 , आयुष वेर्लेकर 3 , उदित यादव 0, शिवेंद्र भुजबळ 0, दीप कसवणकर 3 , मनीष काकोडे नाबाद 28 , सुजय नाईक 0, फरदीन खान 0 , तिलक जाधव 6-42 , अर्शिन कुलकर्णी 3-22

गोवा, दुसरा डाव : 33.4 षटकांत सर्वबाद 134 (देवनकुमार चित्तम 43 , सनथ नेवगी 0, इशान शेख 9, कौशल हट्टंगडी 7 , आयुष वेर्लेकर 1, उदित यादव 7 , शिवेंद्र भुजबळ 7 , दीप कसवणकर 0 , मनीष काकोडे 54 , सुजय नाईक 1, फरदीन खान नाबाद 1 , ए. निषाद 5-48 , निमिर जोशी 2-15

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com