Goa: तनिशाला मिश्र दुहेरीत रौप्यपदक

स्कॉटलंडमधील बॅडमिंटन स्पर्धेत ईशानसह उपविजेतेपद
स्कॉटलंडमधील बॅडमिंटन स्पर्धेतील उपविजेतेपदाच्या पदकासह तनिशा क्रास्टो (डावीकडे) व ईशान भटनागर.
स्कॉटलंडमधील बॅडमिंटन स्पर्धेतील उपविजेतेपदाच्या पदकासह तनिशा क्रास्टो (डावीकडे) व ईशान भटनागर.Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोमंतकीय युवा बॅडमिंटनपटू (Badminton) तनिशा क्रास्टो (Tanisha Krasto) हिने छत्तीसगडच्या ईशान भटनागर याच्या साथीत स्कॉटलंडमधील बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली. ग्लास्गो येथे झालेल्या स्कॉटिश ओपन इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडीस मिश्र दुहेरीत उपविजेतेपद मिळाले.

स्कॉटलंडमधील बॅडमिंटन स्पर्धेतील उपविजेतेपदाच्या पदकासह तनिशा क्रास्टो (डावीकडे) व ईशान भटनागर.
Goa: भ्रष्टाचाऱ्याना भाजपचे समर्थन;कार्लुस आल्मेदा

चुरशीच्या अंतिम लढतीत तनिशा-ईशान जोडीस इंग्लंडच्या (England) कॅलम हेमिंग व जेसिका प्यू जोडीकडू 21-15 , 21-17 फरकाने हार पत्करावी लागली. त्यापूर्वी उपांत्य लढतीत भारतीय जोडीने डेन्मार्कच्या जेस्पर टॉफ्ट व डेनक्लारा ग्रेव्हर्सन जोडीस 21-19 , 21-14 फरकाने, तर उपांत्यपूर्व फेरीत स्कॉटलंडच्या अलेक्झांडर ड्यून व स्कोसियारा टोरॅन्स जोडीस 21-14 , 21-11 असे नमविले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
India Wins By 124 Runs in Asian Games
Five Centuries In A Single ODI Match
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com