Churchill Brothers FC Vs FC Goa
Churchill Brothers FC Vs FC GoaDainik Gomantak

Goa Professional League: चर्चिल ब्रदर्सची विजयी सलामी; एफसी गोवा संघावर एका गोलने मात

सेझा फुटबॉल अकादमी आणि यंग बॉईज ऑफ टोंक यांच्यात सोमवारी सामना
Published on

Goa Professional Football League Churchill Brothers FC Vs FC Goa: गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सने विजयी सलामी देताना एफसी गोवा संघाला १-० फरकाने नमविले. सामना रविवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

गोलशून्य पूर्वार्धानंतर सामन्यातील एकमेव गोल ५५व्या मिनिटाल ट्रिजॉय डायस याने नोंदविला. तोच सामन्याचा मानकरी ठरला.

ब्रॅडली याच्या लांबवरील पासवर चर्चिल ब्रदर्सच्या कर्णधाराने शानदार गोल केला. उत्तरार्धात ट्रिजॉय डायस याला आणखी दोन संधी होत्या, परंतु दोन्ही वेळेस त्याचे फटके गोलपट्टीवरून गेले.

Churchill Brothers FC Vs FC Goa
Goa Yachting Association: सेलिंग पात्रतेनंतरही कात्या कुएल्होचे नाव वगळले, आयक्यू फॉईल प्रकारात ठरलेली पहिली महिला सेलर

दोन्ही संघांनी पूर्वार्धात गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. ट्रिजॉयला फटका दिशाहीनठरल्यानंतर एफसी गोवाचा बचावपटू बालकरण सिंग याने ज्योबर्न कार्दोझ यांचा फटका वेळीच रोखला.

एफसी गोवा संघालाही संधी होती, मात्र प्रचित गावकर याचा सणसणीत फ्रीकिक फटका चर्चिल ब्रदर्सचा गोलरक्षक सुभजीत भट्टाचारजी याने गोलरक्षकाने उधळून लावला.

Churchill Brothers FC Vs FC Goa
India Team Coach: एशियन गेम्ससाठी भारतीय क्रिकेट संघांच्या प्रशिक्षकांची नावे आली समोर, 'या' दिग्गजांकडे जबाबदारी

एफसी गोवाच्या वेलिंग्टन फर्नांडिसने चर्चिल ब्रदर्सच्या गोलक्षेत्रात जोरदार मुसंडी मारली, परंतु त्याचा फटका थोडक्यात हुकल्यामुळे एफसी गोवा संघाला बरोबरीपासून वंचित राहावे लागले.

इंज्युरी टाईममध्ये गोलरक्षक सुभजीत पुन्हा एकदा चर्चिल ब्रदर्सच्या मदतीस धावून आला. त्यामुळे एफसी गोवाच्या लेम्मेट तांगवा याचा फटका सफल ठरला नाही.

सेझा-वायबीटी सामना आज

स्पर्धेत सोमवारी (ता. 28) सेझा फुटबॉल अकादमी आणि पदार्पण करणारा संघ यंग बॉईज ऑफ टोंक (वायबीटी) यांच्यात म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर सामना होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com