Goa Yachting Association: सेलिंग पात्रतेनंतरही कात्या कुएल्होचे नाव वगळले, आयक्यू फॉईल प्रकारात ठरलेली पहिली महिला सेलर

आशियाई क्रीडा स्पर्धा: सेलिंगमधील पात्रतेनंतरही 634 खेळाडूंत स्थान नाही
 Katyi
Katyi Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Yachting Association गोव्याची आंतरराष्ट्रीय महिला सेलर कात्या कुएल्हो हिने या वर्षी फेब्रुवारीत चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळविली, तेव्हा ती या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी भारताची आयक्यू फॉईल प्रकारातील पहिली महिला सेलर ठरली होती, मात्र पुढील महिन्यातील स्पर्धेसाठी केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या ६३४ खेळाडूंच्या यादीत तिचे नाव झळकले नाही.

 Katyi
Goa Road Condition: भाटलेतील रस्त्याची चाळण, दुरुस्‍तीकडे दुर्लक्ष...

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी कात्या देशाचे प्रतिनिधित्व करेल हे जवळपास निश्चित होते, मात्र तिचे ऐनवेळी नाव कसे गळाले याबाबत गोवा यॉटिंग असोसिएशनला माहिती नाही. ‘‘यासंदर्भात भारतीय यॉटिंग महासंघाशी चर्चा केल्यानंतरच खरे कारण कळेल,’’ असे राज्य संघटनाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.

यापूर्वी २०१८ मधील जाकार्ता येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत कात्या सहभागी झाली होती. याशिवाय २०१४ साली चीनमधील नँजिंग येथे झालेल्या यूथ ऑलिंपिकमध्येही तिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

 Katyi
Bicholim News: शहरातील ‘त्या’ पोदेरांवर कारवाई होणार, पालिकेने स्पष्ट केलंय कारवाई मागचं 'हे' कारण

प्राप्त माहितीनुसार, भारतीय ऑलिंपिक संघटनेने केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे ८५० खेळाडूंची प्राथमिक यादी पाठविली होती, त्यात कात्या हिचे नाव होते.

क्रीडा मंत्रालयाने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सेलिंग क्रीडा प्रकारात १६ सेलर्सना मंजुरी दिली आहे. आशियातील खेळाडूंच्या मानांकनानुसार भारतीय खेळाडूंना मंजुरी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

बीच व्हॉलिबॉलपटूंची नावेही यादीत नाहीत

मागील जुलै महिन्यात गोव्याचा अनुभवी व्हॉलिबॉलपटू रामा धावसकर याने नितीन सावंत याच्या साथीने राष्ट्रीय बीच व्हॉलिबॉल निवड चाचणी स्पर्धेत विजेतेपद मिळविले, त्यामुळे या जोडीला आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्वाची पात्रता मिळाली होती.

भारतीय व्हॉलिबॉल महासंघाच्या अस्थायी समितीतर्फे चेन्नई येथे निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती. क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या यादीत धावसकर व सावंत यांच्या नावांचाही समावेश नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com