India Team Coach: एशियन गेम्ससाठी भारतीय क्रिकेट संघांच्या प्रशिक्षकांची नावे आली समोर, 'या' दिग्गजांकडे जबाबदारी

Asian Games 2023: चीनमधील एशियन गेम्समध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय क्रिकेट संघांच्या प्रशिक्षकांची नावेही समोर आली आहेत.
Team India
Team IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

Asian Games India men's and women's team head coach:

सप्टेंबर-ऑक्टोबर 2023 दरम्यान चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games) खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत यंदा क्रिकेटचाही समावेश करण्यात आला असून टी20 प्रकारातील सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी आता भारतीय संघाच्या प्रशिक्षकांची नावेही समोर आली आहेत.

बीसीसीआयने यापूर्वीच आशियाई क्रीडा स्पर्धासाठी भारताच्या महिला आणि पुरुष संघांची घोषणा केलेली आहे. आता प्रशिक्षकांबद्दलही अंतिम निर्णय झाला आहे.

भारतीय पुरुष संघाचे प्रशिक्षक

ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून व्हीव्हीएस लक्ष्मण काम पाहाणार आहे.

लक्ष्मण सध्या बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे. तसेच त्याने यापूर्वीही राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचा प्रभारी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

Team India
भारताला धक्का! विनेश फोगट 'या' कारणाने Asian Games मधून बाहेर; 19 वर्षीय खेळाडूला संधी

लक्ष्मणसह भारताच्या पुरुष संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून साईराज बहुतुले असेल, तर मुनिष बाली क्षेत्ररक्षक प्रशिक्षक असणार आहेत.

या स्पर्धेदरम्यान भारताचा पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि अन्य सपोर्ट स्टाफ वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या तयारीत व्यस्त असणार आहेत.

भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक

खरंतर सध्या भारतीय महिला संघाच्या पूर्णवेळ मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती अद्याप झालेली नाही. ही नियुक्ती डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे.

त्यामुळेच आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाचा प्रभारी प्रशिक्षक म्हणून हृषिकेश कानिटकर जबाबदारी सांभाळणार आहे. त्यांनी यापूर्वी फेब्रुवारीमध्ये टी२० वर्ल्डकप स्पर्धेतही भारताचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते.

कानिटकर व्यतिरिक्त भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये राजिब दत्ता गोलंदाजी प्रशिक्षक आणि सुभादीप घोष क्षेत्ररक्षक प्रशिक्षक म्हणून काम पाहातील.

Team India
'तेव्हा शॉकच बसला, पण...', Asian Games मधून वगळल्यानंतर शिखरची मनमोकळी प्रतिक्रिया

आशियाई स्पर्धेत क्रिकेट

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेट संघाची स्पर्धा 19 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर 2023 दरम्यान खेळवली जाणार आहे. तसेच पुरुष क्रिकेट स्पर्धा 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेतील सामने झेजियांग युनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी पिंगफेंग क्रिकेट फिल्ड येथे होणार आहेत.

भारताचे संघ -

  • पुरुष संघ - ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक)

    राखीव खेळाडू - यश ठाकूर, आर साई किशोर, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन

  • महिला संघ - हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, दिप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनज्योत कौर, देविका वैद्य, अंजली सारवानी, तितास साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका अहुजा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), अनुषा बारेड्डी.

    राखीव खेळाडू - हर्लिन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक, पुजा वस्त्राकर.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com