37th National Games Goa 2023: मुख्यमंत्र्यांची यशस्वी शिष्टाई; राज्य क्रीडा संघटनांचा बहिष्कार मागे

19 कोटी रुपयांचा निधी मंजूर; नेमबाजी स्पर्धा गोव्यातच!
CM pramod sawant
CM pramod sawantDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Olympic Association Withdraws Protest: 37व्‍या राष्‍ट्रीय क्रीडा स्‍पर्धेच्‍या मशाल प्रज्वलन कार्यक्रमावर गोवा ऑलिंपिक संघटना आणि राज्य क्रीडा संघटनांच्या बहिष्काराचे सावट होते. मात्र, याकामी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची शिष्टाई यशस्वी ठरली.

मंत्रिमंडळ बैठकीच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी क्रीडा संघटनांनी मशाल प्रज्वलन कार्यक्रमावर बहिष्कार घालू नये, असे आवाहन त्यांनी केले होते.

CM pramod sawant
37th National Games Goa 2023: राष्ट्रीय स्पर्धेचे आणखी एक पाऊल पुढे; मशाल प्रज्वलित

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, ‘‘क्रीडा शिबिरांसाठी झालेल्या खर्चापैकी ८० टक्के रक्कम गोवा राज्य क्रीडा प्राधिकरणाकडे जमा केलेली आहे. संघटनांना क्रीडा साहित्य घेण्यासाठी लागणाऱ्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम व राज्य क्रीडा प्राधिकरणाकडे जमा केलेली आहे.

संघटनांच्या प्रतिनिधींनी प्राधिकरणाच्या संचालकांची भेट घेऊन याची खात्री करून घ्यावी. शिबिरांत सहभागींची नावे सादर करण्यात आली होती, त्याची छाननी करण्यासाठी काही वेळ लागला. यामुळे ही रक्कम वितरित करण्यात विलंब झाला याची सरकारला कल्पना आहे.’’

प्रशिक्षण-सराव शिबिरे आणि क्रीडा उपकरणे खरेदीसाठी राज्य सरकारने आर्थिक निधी देण्याविषयी दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याने गोवा ऑलिंपिक असोसिएशनच्या झेंड्याखाली विविध खेळांच्या राज्य संघटनांनी मशाल प्रज्वलन कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचे गुरुवारी जाहीर केले होते.

परंतु शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी निधी संदर्भात स्पष्टीकरण दिल्यानंतर हा बहिष्कार मागे घेण्यात आल्याचे गोवा ऑलिंपिक संघटनेने जाहीर केले व मशाल प्रज्वलन कार्यक्रमावरील सावट दूर झाले.

CM pramod sawant
Goa Unsafe Buildings: नौदलाच्या असुरक्षित इमारती रडारवर

१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर

क्रीडामंत्री गावडे यांनी शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा शिबिरे आणि क्रीडा उपकरणे खरेदी यासाठी १९ कोटी रुपयांची निधी मंजूर झाला असून गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या खात्यात जमा झाल्याची माहिती दिली.

संबंधित क्रीडा संघटनांना ही उपकरणे खरेदीसाठी ८० टक्के रक्कम दिली जाईल आणि २० टक्के रक्कम पडताळणी प्रक्रियेनंतर दिली जाईल, असे सांगितले.

नेमबाजी स्पर्धा गोव्यातच!

यश शूटिंग अकादमीने मांद्रे व पेडणे येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे निकष पूर्ण करणारी नेमबाजी सुविधा विकसित केली आहे.

त्या अनुषंगाने क्रीडामंत्री गावडे यांनी सांगितले, की ‘‘यश शूटिंग अकादमीच्या सुविधांकडे गुंतवणूक या दृष्टीने पाहता येईल. तेथील सुविधा सज्ज असल्यास नेमबाजी स्पर्धा गोव्यातच घेण्यास प्राधान्य असेल.

अधिकाधिक खेळ गोव्यातच व्हावे हे आमचे ध्येय आहे. यापूर्वीच दिल्ली येथी कर्णी सिंग स्टेडियम इनडोअर स्टेडियम नेमबाजीसाठी आरक्षित केलेले असले, तरी गोव्यात स्पर्धा होऊ शकते.’’

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com