मोरजी: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या (National Sports Competition) निमित्ताने का होईना सावळवाडा-पेडणे (Savalwada-Pedne) येथे 35 कोटी रुपये खर्च करून इनडोअर स्टेडियम (Indoor stadium) उभारण्यात आले. त्याशिवाय राज्यातील शहरांमध्ये क्रीडा (Sports) क्षेत्रासाठी साधनसुविधा निर्माण होत आहेत. परंतु, गावांमध्ये मात्र मैदानांची वानवाच (Lack of grounds) आहे. ग्रामीण भागात जास्तीत जास्त क्रीडापटू निर्माण करायचे असतील तर पुरेशा साधनसुविधा पुरवण्याची गरज व्यक्त होत आहे.
पेडणे तालुक्यातील बहुतांश क्रीडा मैदानांत साधनसुविधांची कमतरता आहे. दहा वर्षांपूर्वी बाबू आजगावकर क्रीडा मंत्री झाले त्यावेळी त्यांनी प्रथम धारगळ येथे क्रीडा नगरीसाठी जागा संपादित केली. मात्र, त्याठिकाणी क्रीडा नगरी उभारण्यात त्यांना यश आले नाही. आता त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान उभारण्यासाठी आजगावकर कार्यरत आहेत. राष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने का होईना पेडणेत सुसज्ज असे इनडोअर स्टेडियम मिळाले आहे. परंतु, गावांतील क्रीडामैदाने दुर्लक्षितच आहेत.
एकदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वी झाली, की गावागावांतील क्रीडा मैदानाकडे लक्ष देण्यात येईल. तसेच धारगळ येथील क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जातील.
- बाबू आजगावकर, उपमुख्यमंत्री
मोजक्याच ठिकाणी व्यवस्था
सध्या पेडणे तालुक्यात मोरजी, मांद्रे, कोरगाव, चोपडे, वारखंड, तुये या ठिकाणी क्रीडा मैदाने आहेत. चोपडे व तुये ही नवीन मैदाने उभारलेली आहेत. मात्र, मोरजी आणि मांद्रे ही जुनी मैदाने आहेत. गावातील क्रीडा मैदानांची स्थिती दयनीय आहे. तिथे कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.
निविदा मंजूर, पण कामच बंद
मोरजी मैदानाच्या नूतनीकरणासाठी ९६ लाख रुपये दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाले आहेत. निविदाही मंजूर झाली आहे. तरीही कंत्राटदाराने अजून कामाला सुरुवातच केलेली नाही, अशी माहिती प्राप्त झाली. सध्या हे मैदान क्रीडाप्रेमींसाठी डोकेदुखी ठरत आहे. व्हीआयपी आसन व्यवस्थेवरचे छप्पर मोडले आहे. आसन व्यवस्था आणि संरक्षक भिंतीला तडे गेले आहेत. मैदानावरची हिरवळ गायब आहे. क्रीडा मंत्री पेडणे तालुक्याचे लोकप्रतिनिधी असूनही या मैदानाकडे त्यांनी लक्ष दिलेले नाही.
नवीन मैदाने कधी?
पेडणे तालुक्यात एकूण वीस ग्रामपंचायती आणि एक नगरपालिका आहे. या भागातील क्रीडाप्रेमींनी राज्य आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कारकीर्द यशस्वी केली. परंतु, सध्या पेडणे तालुक्यात क्रीडापटूंसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा आजही उपलब्ध नाहीत. धारगळ येथे क्रीडानगरीच्या जागेत भव्य आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, गावातील जी क्रीडांगणे आहेत त्याची दुरुस्ती करण्यावर भर दिला जात नाही. तसेच नवीन क्रीडांगणे उभारण्यासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया केली जात नाही.
मोजक्याच ठिकाणी व्यवस्था
सध्या पेडणे तालुक्यात मोरजी, मांद्रे, कोरगाव, चोपडे, वारखंड, तुये या ठिकाणी क्रीडा मैदाने आहेत. चोपडे व तुये ही नवीन मैदाने उभारलेली आहेत. मात्र, मोरजी आणि मांद्रे ही जुनी मैदाने आहेत. गावातील क्रीडा मैदानांची स्थिती दयनीय आहे. तिथे कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.
निविदा मंजूर, पण कामच बंद
मोरजी मैदानाच्या नूतनीकरणासाठी ९६ लाख रुपये दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाले आहेत. निविदाही मंजूर झाली आहे. तरीही कंत्राटदाराने अजून कामाला सुरुवातच केलेली नाही, अशी माहिती प्राप्त झाली. सध्या हे मैदान क्रीडाप्रेमींसाठी डोकेदुखी ठरत आहे. व्हीआयपी आसन व्यवस्थेवरचे छप्पर मोडले आहे. आसन व्यवस्था आणि संरक्षक भिंतीला तडे गेले आहेत. मैदानावरची हिरवळ गायब आहे. क्रीडा मंत्री पेडणे तालुक्याचे लोकप्रतिनिधी असूनही या मैदानाकडे त्यांनी लक्ष दिलेले नाही.
पेडण्यातील गावांमध्ये मैदानांची दुरवस्था मुलांनी खेळायचे कुठे? : पुरेशा साधनसुविधा पुरवण्याची क्रीडापटूंची मागणी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.