Goa: फेणी या मद्याला सरकारने दिला ‘जीआय’ चा दर्जा

हल्लीच गोवा सरकारने राज्यातील फेणी या मद्याला ‘जीआय’चा दर्जा देऊन त्यासंदर्भात गोवा फेणी धोरण 2021ची अधिसूचनाही जारी केली आहे
Goa government assign GI for Feni
Goa government assign GI for FeniDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

हल्लीच गोवा सरकारने राज्यातील फेणी या मद्याला ‘जीआय’चा दर्जा देऊन त्यासंदर्भात गोवा फेणी धोरण 2021ची अधिसूचनाही जारी केली आहे

या निर्णयाचे गोवा काजू फेणी डिस्टिलर्स अँड बॉटलर्स असोसिएशनतर्फे अध्यक्ष गुरुदत्ता भक्ता यांनी स्वागत केले आहे . या फेणीला

‘हेरिटेज स्पिरिट ऑफ गोवा’ मिळाल्याने आता ही फेणी देशात तसेच विदेशात निर्यात करण्यासाठी असोसिएशनने पावले उचलली आहेत. या दर्जामुळे काजू फेणी व त्याच्या भागधारकांना काजू फेणीची स्थिती ‘गोवा हेरिटेज ड्रिंक’चा लाभ देण्यासाठी काजू फेणी उत्पादकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न असेल असे भक्ता म्हणाले.

काजू फेणी उद्योगाचा फायदा ग्रामीण व सामान्य शेतकऱ्यांना तसेच गावातील लोकांना होणार आहे. यापूर्वी त्यांना या उत्पादनासाठी सरकारकडून कोणतेच अनुदान तसेच आर्थिक साहाय्य मिळत नव्हते. सरकारच्या या धोरणामुळे काजू फेणी तयार करणाऱ्यांना सक्षम होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्‍यांच्‍या कौशल्यातून फेणीचा दर्जा वाढेल व या उद्योगातून टाकाऊ गोष्‍टींचे प्रमाण कमी होईल. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत व मुख्यमंत्र्यांच्या स्वयंपूर्ण गोवा तत्त्‍वानुसार ही वाटचाल आहे, असे सचिव हँसल वाझ म्हणाले.

गोवा फेणी धोरण निश्‍चित झाले तरी पुढील काम खूप आहे. या धोरणामुळे इतर देशांप्रमाणेच गोव्यातील काजू फेणीला जगात जीआय टॅग मिळेल. मात्र, त्यासाठी जगात जशी त्यांच्या देशाच्या मद्याची जाहिरात विमानतळ, क्रुझ बोटी, वाहतूक ठिकाणे येथे केली जाते तशी फेणी या विविध ठिकाणी करमुक्त उपलब्ध करण्याची गरज

आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com