U-25 CK Nayudu Trophy: गुजरातविरुद्ध सामन्यात गोव्यासमोर फॉलोऑनचे संकट

गुजरातविरुद्धच्या पहिल्या डावात गोव्याची फलंदाजी गडगडली
Cricket
CricketDainik Gomantak

U-25 CK Nayudu Trophy: गोव्याची फलंदाजी पुन्हा एकदा गडगडली, त्यामुळे गुजरातविरुद्ध कर्नल सी. के. नायडू करंडक (25 वर्षांखालील) क्रिकेट सामन्यात यजमानांसमोर फॉलोऑनला संकट उभे ठाकले. सांगे येथील जीसीए मैदानावर सुरू असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर गोव्याचा कर्णधार कश्यप बखले 49 धावांवर नाबाद आहे. त्याच्यावर सारी मदार आहे.

त्याचवेळी तळाच्या फलंदाजांना कर्णधारास खंबीर साथ द्यावी लागेल. गोव्याने पहिल्या डावात सोमवारी खेळ थांबला तेव्हा 7 बाद 129 धावा केल्या. त्यांना फॉलोऑन टाळण्यासाठी अजून 91 धावांची गरज आहे.

Cricket
Mormugao : अखेर आठवड्यानंतर खलाशाचा मृतदेह आढळला

त्यापूर्वी, कालच्या 4 बाद 290 वरून गुजरातचा डाव 369 धावांत आटोपला. गोव्याच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांच्या बाकी सहा विकेट मोठी धावसंख्या उभारणार नाही याची दक्षता घेतली, पण फलंदाजांनी त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले. कश्यप याचा अपवाद वगळता इतरांनी फक्त खेळपट्टीवर हजेरीच लावली.

6 बाद 81 वरून कश्यप व कीथ पिंटो यांनी सातव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला सव्वाशे धावांच्या जवळ जाता आले. दिवसातील चार षटके बाकी असताना विशाल जयस्वाल याने कीथच्या यष्ट्यांच्या वेध घेतला आणि जमलेली जोडी फुटली.

Cricket
Sahitya Akademi : सर्वसाधारण मंडळावर पूर्णानंद च्यारी आणि मेल्विन रॉड्रिग्ज यांची निवड

संक्षिप्त धावफलक

गुजरात, पहिला डाव (4 बाद 290 वरून) : 124.2 षटकांत सर्वबाद 369 (स्मित पटेल 72, सनप्रीत बग्गा 49, जय मालुसरे 18, जयवीर सिंग 11, शुभम तारी 23-3-64-2, हेरंब परब 22-6-46-0, समीत आर्यन मिश्रा 18.2-3-58-3, कीथ पिंटो 34-8-99-2, दीप कसवणकर 18-1-70-1, तुनीष सावकार 7-1-24-0, योगेश कवठणकर 2-0-4-2).

गोवा, पहिला डाव : 51 षटकांत 7 बाद 129 (आदित्य सूर्यवंशी 6, वैभव गोवेकर 19, आयुष वेर्लेकर 3, कश्यप बखले नाबाद 49, योगेश कवठणकर 2, दीप कसवणकर 11, तुनीष सावकार 7, कीथ पिंटो 25, हेरंब परब नाबाद 1, जयवीर सिंग 3-47, विशाल जयस्वाल 3-23).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com