Goa Cricket: तेज गोलंदाजीसाठी पाच उमेदवार

Goa Cricket: मुख्य प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजांची चाचणी
Goa Cricket Association Indoor Academy  at Porvorim.
Goa Cricket Association Indoor Academy at Porvorim.Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनने (Goa Cricket Association) वेगवान गोलंदाजीत पाहुणा क्रिकेटपटू (Guest Players) निवडताना पाच जणांची चाचणी घेण्याची ठरविले आहे. अर्ज केलेल्या गोलंदाजांपैकी विकास टोकस, सुबोध भाटी, दीपक पुनिया, श्रीकांत वाघ, शुभम रांजणे यांना चाचणीसाठी बोलावले असल्याची माहिती जीसीए सचिव विपुल फडके (Vipul Fadke) यांनी बुधवारी दिली. विपुल यांनी सांगितले, की गोव्याच्या रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक के. भास्कर पिल्लई गुरुवारपर्यंत दाखल होतील. त्यानंतर एक-दोन दिवसांत त्यांच्या मार्गदर्शनाखाली निमंत्रित केलेले पाचही गोलंदाज चाचणी देतील. मुख्य प्रशिक्षकाच्या अहवालानुसार नंतर जीसीए खेळाडूशी करार करेल. सर्व खेळाडूंची तंदुरुस्ती चाचणीही निर्णायक ठरेल.

Goa Cricket Association Indoor Academy  at Porvorim.
Goa Cricket: पुनरागमनासाठी अमित यादव प्रयत्नशील

श्रीकांत वाघ 32 वर्षांचा आहे. विदर्भाचा हा डावखुरा वेगवान गोलंदाज डावखुरा फलंदाज आहे. आयपीएल स्पर्धेत पुणे वॉरियर्सकडून खेळलेल्या श्रीकांतने नोव्हेंबर 2007 ते नोव्हेंबर 2018 या कालावधीत विदर्भाचे रणजी स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. त्याने 64 प्रथम श्रेणी 161 विकेट टिपल्या असून एक शतक आणि पाच अर्धशतकांसह 1646 धावाही केल्या आहेत. दिल्लीकडून खेळलेला विकास टोकस 34 वर्षांचा आहे. नोव्हेंबर 2010 ते डिसेंबर 2017 या कालावधीत तो दिल्लीकडून रणजी स्पर्धेत खेळला. त्याने 15 प्रथम श्रेणी सामन्यांत 32 गडी बाद केले आहेत.सुबोध भाटी हा सुद्धा दिल्लीचा असून 30 वर्षांचा आहे. नोव्हेंबर 2015 ते जानेवारी 2020 या कालावधीत दिल्लीकडून खेळलेल्या या वेगवान गोलंदाजाने आठ प्रथम श्रेणी सामन्यात 19 गडी बाद केले आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत सेनादल, हरियाना, सौराष्ट्र या संघाकडून खेळलेला दीपक पुनिया 27 वर्षांचा आहे. डिसेंबर 2014 मध्ये सेनादलाकडून त्याने रणजी स्पर्धेत पदार्पण केले. शेवटच्या वेळेस तो ऑक्टोबर 2017 मध्ये तो हरियानाकडून खेळला. 20 प्रथम श्रेणी सामन्यांत त्याने 34 गडी बाद केले आहेत. रणजी करंडक स्पर्धेत मुंबईकडून खेळलेला 27 वर्षीय शुभम रांजणे अष्टपैलू आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये मुंबईकडून शेवटचा रणजी सामना खेळलेल्या शुभमने 12 प्रथम श्रेणी सामन्यांत पाच गडी बाद केले असून चार अर्धशतकांच्या मदतीने 513 धावा केल्या आहेत.

Goa Cricket Association Indoor Academy  at Porvorim.
Goa Ranji Cricket: मुंबईचा शुभम रांजणे गोव्याकडून खेळण्यास इच्छुक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com