T20: गोव्याची विजयी दौड कायम; पुदुचेरीवर सहा विकेट राखून मात

मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत गोवा सुसाट
 T20 cricket
T20 cricketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याने शनिवारी पुदुचेरीवर सहा विकेट राखून मात करत सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील मोहिमेचा समारोप गोड केला. ‘ब’ गटातील आठ संघांत त्यांना चौथा क्रमांक मिळाला.

(Goa beat Puducherry in the Mushtaq Ali Trophy T20 cricket tournament)

जयपूर येथे झालेल्या स्पर्धेत गोव्याने सातपैकी चार सामने जिंकले, तर तीन सामने गमावले. पंजाब व दिल्लीने प्रत्येकी 24 गुणांसह अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक मिळविला. उत्तर प्रदेश, गोवा व हैदराबादचे प्रत्येकी 16 गुण झाले व त्यांना अनुक्रमे तिसरा, चौथा व पाचवा क्रमांक मिळाला. त्यानंतर त्रिपुरा (12 गुण), मणिपूर (4 गुण) यांना स्थान मिळाले. पुदुचेरीला सर्व सातही सामन्यांत पराभव पत्करावा लागला.

 T20 cricket
IND vs PAK: रोहित-विराटचे बल्ले-बल्ले! पाक संघातून भारताचा हा दुश्मन आऊट

सुयशकडे नेतृत्व

गोव्याने शनिवारी राखीव फळीतील खेळाडूंना खेळविले. पुदुचेरीच्या स्पर्धेतील कमजोर कामगिरीमुळे गोव्याच्या संघ बदलावर परिणाम झाला नाही. स्नेहल कवठणकरने विश्रांती घेतल्यामुळे सुयश प्रभुदेसाई प्रथमच सीनियर पातळीवर गोव्याचे नेतृत्व केले.

फिरकी गोलंदाज अमित यादव (4-12) याच्या प्रभावी गोलंदाजीमुळे पुदुचेरीचा डाव 88 धावांत गुंडाळणे गोव्याला शक्य झाले. नंतर ईशान गडेकरने 24 चेंडूत सहा चौकार व दोन षटकारांच्या मदतीने केलेल्या 45 धावा, तसेच तुनीष सावकारच्या नाबाद 23 धावांच्या बळावर गोव्याने 12.4 षटकांतच चार विकेट गमावून विजय साकारला.

 T20 cricket
U-17 WC: टांझानियाला नमवत कोलंबिया उपांत्य फेरीत दाखल

संक्षिप्त धावफलक

पुदुचेरी;18 षटकांत सर्वबाद 88 (डी. रोहित 11, आकाश करगावे 35, भारतभूषण शर्मा 20, अर्जुन तेंडुलकर 3-0-16-1, लक्षय गर्ग 3-0-18-2, अमित यादव 4-0-12-4, अमूल्य पांड्रेकर 2-0-7-1, वेदांत नाईक 2-0-10-0, सिद्धेश लाड 2-0-11-0, सुयश प्रभुदेसाई 2-0-13-0) पराभूत वि. गोवा ;12.4 षटकांत 4 बाद 89 (ईशान गडेकर 45, दीपराज गावकर 10, अर्जुन तेंडुलकर 0, विश्वंबर काहलोन 0, तुनीष सावकार नाबाद 23, समर दुभाषी नाबाद 6, भारतभूषण शर्मा 1-15, डी. रोहित 1-9, अंकित शर्मा 2-34).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com