U-17 WC: टांझानियाला नमवत कोलंबिया उपांत्य फेरीत दाखल

नऊ खेळाडूंसह खेळलेल्या टांझानियावर मात
U-17 WC
U-17 WCDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: कोलंबियाने फिफा 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक स्पर्धेत प्रथमच उपांत्य फेरी गाठताना टांझानियावर 3-0 फरकाने मात केली. आफ्रिकेतील संघातील दोघींना रेड कार्ड दाखविण्यात आले, त्यामुळे पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत खेळताना त्यांना नऊ खेळाडूंसह दक्षिण अमेरिकन संघाला आव्हान द्यावे लागले.

(Colombia beat Tanzania in Women's Under 17 World Cup tournament)

U-17 WC
T20 World Cup: भारत-पाक सामन्यादरम्यान ग्लॅमरचा तडका, तुम्ही म्हणाल...

फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी झालेल्या लढतीत कोलंबियाने सर्व गोल पूर्वार्धातील खेळात नोंदविले. कर्णधार लिंडा कायसेदो हिने तिसऱ्याच मिनिटास पहिला गोल केला. 17 व्या मिनिटास येसिका मुनोझ हिने संघाची आघाडी 2-0 अशी मजबूत केली. नंतर पेनल्टी फटक्यावर अचूक नेम साधत 36 व्या मिनिटास गॅब्रिएला रॉड्रिगेझ हिने कोलंबियाची आघाडी 3-0 अशी भक्कम केली. यावेळी टांझानियाने गोलरक्षक बदलूनही फायदा झाला नाही.

U-17 WC
IND vs PAK: रोहित-विराटचे बल्ले-बल्ले! पाक संघातून भारताचा हा दुश्मन आऊट

सामन्याच्या 23 व्या मिनिटास टांझानियाच्या झैनाबू ॲली हिला ‘व्हीएआर’ पाठून रेफरीने थेट रेड कार्ड दाखविले, त्यामुळे त्यांना दहा खेळाडूंसह खेळावे लागले. 87 व्या मिनिटास सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे कर्णधार नोएला लुहाला हिला रेड कार्डसह मैदान सोडावे लागले, त्यामुळे उर्वरीत कालावधीत टांझानियास नऊ खेळाडूंसह खेळावे लागले.

कोलंबियाने यापूर्वी चार वेळा 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक स्पर्धेत खेळताना साखळी फेरी पार केली नव्हती व फक्त एक सामना जिंकला होता. यंदा भारतात त्यांनी कमाल केली. साखळी फेरीत तीनपैकी दोन सामने जिंकल्यानंतर कार्लोस पॅनियाग्वा यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने उपांत्य फेरीत नायजेरियाशी गाठ पक्की केली. कोलंबिया व नायजेरिया यांच्यातील उपांत्य सामना फातोर्डा येथेच 26 ऑक्टोबरला होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com