Glenn Phillips Record: धावांचा पाऊस अन् विक्रमांची बरसात! किवी स्टार ग्लेन फिलिप्सचा विराट पराक्रम; एकाच झटक्यात मोडले अनेक रेकॉर्ड्स

Glenn Phillips Century vs India: सुरुवातीला अवघ्या 34 धावांवर दोन गडी बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या ग्लेन फिलिप्सने एकतर्फी किल्ला लढवत सामन्याचे चित्र पालटले.
Glenn Phillips Record
Glenn Phillips RecordDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Glenn Phillips Record: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने तुफानी फलंदाजी करत भारतासमोर विजयासाठी मोठा डोंगर उभा केला. ऑकलंडच्या ईडन पार्क मैदानावर झालेल्या या सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना किवी संघाने निर्धारित 20 षटकांत 259 धावा केल्या.

सुरुवातीला अवघ्या 34 धावांवर दोन गडी बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या ग्लेन फिलिप्सने एकतर्फी किल्ला लढवत सामन्याचे चित्र पालटले. फिलिप्सने अवघ्या 49 चेंडूत 107 धावांची तडाखेबंद शतकी खेळी खेळली, ज्यामध्ये 6 चौकार आणि तब्बल 10 गगनचुंबी षटकार लगावले. या तुफानी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने हा सामना 87 धावांनी आपल्या नावावर केला.

Glenn Phillips Record
Team India ODI Series: 2027 वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची अग्निपरीक्षा! न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेसह 'या' संघांविरुद्ध होणार सामने; पाहा संपूर्ण वेळापत्रक

या ऐतिहासिक शतकासह ग्लेन फिलिप्सने एकाच टी-20 मालिकेत भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा मोठा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होपचा विक्रम मोडला, ज्याने यावर्षी ऑक्टोबरच्या सुरुवातीला भारता विरुद्धच्या मालिकेत 261 धावा केल्या होत्या. फिलिप्सने या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक 276 धावा केल्या. या यादीत इंग्लंडचा हॅरी ब्रूक (229 धावा) आणि वेस्ट इंडिजचा रदरफोर्ड (221 धावा) यांचाही समावेश आहे.

Glenn Phillips Record
Team India World Record: टीम इंडियाचा 'भीमपराक्रम'! टी-20 क्रिकेटमध्ये 200 सामने जिंकणारा भारत ठरला जगातील पहिलाच संघ; रोमहर्षक सामन्यात जपानचा पराभव

याशिवाय, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडतर्फे सर्वाधिक वेळा 'प्लेयर ऑफ द मॅच'चा पुरस्कार जिंकण्याच्या बाबतीत त्याने महान खेळाडू मार्टिन गुप्टिलच्या विक्रमी 10 वेळा हा किताब पटकावण्याच्या कामगिरीची बरोबरी केली. शानदार शतकी खेळीसाठी फिलिप्सला या सामन्यात 'प्लेयर ऑफ द मॅच' म्हणून गौरवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.