Gautam Gambhir Vs Virat Kohli:...जेव्हा गौतम गंभीरने 'मॅन ऑफ द मॅच' चा किताब विराटला दिला, आता 36चा आकडा का?

IPL 2023: पोस्ट मॅच प्रेजेंटेशनमध्ये गौतम गंभीरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला तेव्हा त्याने विराटकडे आपला पुरस्कार सुपूर्द केला.
Gautam Gambhir Vs Virat Kohli
Gautam Gambhir Vs Virat KohliDainik Gomantak

Gautam Gambhir Vs Virat Kohli: विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघेही टीम इंडियासाठी एकत्र खेळले आहेत. विराटने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा गौतम गंभीरने संघात स्वतःची ओळख निर्माण केली होती.

2008 मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या विराटला पहिल्या वनडे शतकासाठी जवळपास वर्षभर वाट पाहावी लागली.

दरम्यान, डिसेंबर 2009 मध्ये विराटने श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावले, त्याच सामन्यात गौतम गंभीरने 150 धावा केल्या आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

पोस्ट मॅच प्रेजेंटेशनमध्ये गौतम गंभीरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला तेव्हा त्याने विराटकडे आपला पुरस्कार सुपूर्द केला.

Gautam Gambhir Vs Virat Kohli
IPL 2023: LSG vs RCB च्या हाय होल्टेज सामन्यात 'या' धाकडने मोडला लसिथ मलिंगाचा मोठा रेकॉर्ड!

त्यानंतर, आगामी काळात दोघांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळेल असे वाटत होते, पण तसे झाले नाही. विराट आणि गंभीरची ऑनफिल्ड लढत पहिल्यांदा IPL 2013 मध्ये पाहायला मिळाली होती.

त्यावेळी विराट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (RCB) कर्णधार होता आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) कर्णधार होता. गंभीर हा लखनऊ सुपरजायंट्स (एलएसजी) चा मेंटॉर आणि विराट हा आरसीबीचा स्टार क्रिकेटर असताना आता पुन्हा एकदा दोघांमध्ये भांडण झाले आहे.

Gautam Gambhir Vs Virat Kohli
IPL 2023: बीसीसीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोहली-गंभीरच्या वादावर केली मोठी कारवाई!

विराट आणि गंभीर यांच्यात 36 चा आकडा का आहे?

असे मानले जाते की, गंभीरला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी फारसा आवडत नव्हता. तर विराट कोहली सुरुवातीपासूनच धोनी कॅम्पमध्ये राहिला आहे. टीम इंडियात (Team India) विराटचे जसजसे महत्व वाढत गेले तसतसे गंभीरचे महत्त्व कमी होत गेले. त्यामुळेच गंभीरला किंग कोहली अजिबात आवडत नाही, असे मानले जाते.

आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील हा दुसरा सामना होता

वास्तविक या मोसमात आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील हा दुसरा सामना होता. बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये पहिला सामना झाला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर एलएसजीने आरसीबीचा एका विकेटने पराभव केला.

या सामन्यानंतर एलएसजीचा मेंटर गंभीरने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर उपस्थित लोकांना तोंडावर बोट ठेवण्याचा इशारा केला होता.

लखनऊमध्ये आरसीबीने विजय मिळवला तेव्हा विराट कोहलीही असेच काही करताना दिसला होता. सामन्यानंतर दोघांमधील भांडण थोडे वाढले, त्यानंतर सहकारी खेळाडूंना हस्तक्षेप करावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com