एफसी गोवाचा आघाडीपटू जोर्गे ओर्तिझ आणखी एका सामन्याला मुकणार

दोन सामन्यांच्या निलंबनामुळे ओर्तिझ शुक्रवारचाही सामना खेळू शकणार नाही.
Jorge OrtizFootball

Jorge Ortiz

Football

Dainik Gomantak

Published on
Updated on

पणजी: शिस्तभंग कारवाईत एफसी गोवाचा स्पॅनिश आघाडीपटू जोर्गे ओर्तिझ (Jorge Ortiz) दोषी ठरला असून त्याच्यावर आणखी एका सामन्याचे निलंबन लादण्यात आले आहे. त्यामुळे तो इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेतील पुढील सामन्यास मुकेल.

Jorge Ortiz

Football

झिलास लायनच्या धर्मा तोरसकरला सामनावीर पारितोषिक; हँडबॉलार्स संघाचा 19-16 पराभव

एफसी गोवा (FC Goa) आणि ओडिशा एफसी यांच्यातील सामना शुक्रवारी (ता. २४) खेळला जाईल. दोन सामन्यांच्या निलंबनामुळे ओर्तिझ शुक्रवारचाही सामना (Match) खेळू शकणार नाही. याच कारणास्तव तो गेल्या शनिवारी हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठीही निलंबित होता. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या शिस्तपालन समितीने त्याला 50,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे. निलंबनाची शिक्षा संपवून ओर्तिझ 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या एटीके मोहन बागानविरुद्धच्या लढतीत एफसी गोवाचे प्रतिनिधित्व करू शकेल.

Jorge Ortiz

Football

PSL 2022: शाहीन आफ्रिदीला मोठी भेट, कर्णधारपदाची मिळाली जबाबदारी

गंभीर गैरवर्तनाचा ठपका

ISL स्पर्धेत ११ डिसेंबर रोजी बंगळूर एफसीविरुद्धच्या फुटबॉल (Football) सामन्यात ओर्तिझने मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडू सुरेशसिंग वांगजाम याला धक्का दिला होता. या कारणास्तव त्याला रेड कार्डही मिळाले होते. सामन्याच्या वेळेस मैदानावर ‘हिंसक आचरण’ केल्याचा आरोप ठेवून शिस्तपालन समितीने ओर्तिझ याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यास उत्तर दिल्यानंतर ओर्तिझ याला 'गंभीर गैरवर्तन' केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. ओर्तिझने आपल्या उत्तरात, 'बंगळूर एफसीचा खेळाडू सुरेशसिंग वांगजाम याच्याप्रती हानीचा कोणताही हेतू नव्हता,' असे नमूद केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com