झिलास लायनच्या धर्मा तोरसकरला सामनावीर पारितोषिक; हँडबॉलार्स संघाचा 19-16 पराभव

झिलास लायनच्या धर्मा तोरसकरला सामनावीर पारितोषिक
Handball

Handball

Dainikgomantak

Published on: 
Updated on: 

मोरजी : चोपडे येथे गोवा (goa) हँडबॉल लीग स्व.उदय पालयेकर स्मृती स्पर्धेला रविवारी प्रारंभ झाला स्पर्धेचा अंतिम सामना बुधवारी सायंकाळी खेळविण्यात येईल. अखिल गोवा पातळीवरील या स्पर्धेत एकूण 6 संघानी भाग घेतला आहे. झिलस लायन आणि नित्झ स्पर्टणस यांच्या झालेला शुभारंभ सामना 25-25 असा झाला. झिलास लायनच्या धर्मा तोरसकरला सामनावीर पारितोषिक देण्यात आले.

<div class="paragraphs"><p>Handball</p></div>
गोव्यात काँग्रेसला बुरे दिन; 17 पैकी राहिले फक्त 2 आमदार

क्लासिक किंग ने हँडबॉलार्स संघाचा 19-16 असा पराभव केला क्लासिक किंगच्या मंजुनाथ पुजारी याला सामना विर पुरस्कार देण्यात आला शिवोलिम युनायटेड संघाने हँडबॉलार्स संघाचा 16-15 असा पराभव केला. सामना वीर म्हणून शीतल कोळमबकर यांची निवड करण्यात आली. चौथ्या सामन्यात क्लासिक किंग ने नीटझ स्पर्टन संघावर 19-18 असा निसटता विजय मिळवला क्लासिक किंग च्या मिहिर म्हालदार याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

उद्घाटन (Inauguration) समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर उपस्थित होते याशिवाय पालयेकर, उमेश लिंगुडकर, देवेंद्र प्रभुदेसाई, अनंत सावळ आदी उपस्थित होते देवेंद्र प्रभुदेसाई यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com