PSL 2022: शाहीन आफ्रिदीला मोठी भेट, कर्णधारपदाची मिळाली जबाबदारी

उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीला पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) 2022 च्या आधी मोठी बातमी मिळाली आहे.
Shaheen Shah Afridi 

Shaheen Shah Afridi 

Dainik Gomantak 

Published on
Updated on

उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीला पाकिस्तान सुपर लीग 2022 च्या आधी मोठी बातमी मिळाली आहे. शाहीन आफ्रिदीला लाहोर कलंदरचा कर्णधार बनवण्यात आले आहे. गेल्या मोसमात संघाचे नेतृत्व करणाऱ्या सोहेल अख्तरच्या जागी शाहीन आफ्रिदीची निवड करण्यात आली आहे.

2018 सालापासून पाकिस्तान सुपर लीगमध्ये (Pakistan Super League) अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या शाहीन आफ्रिदीकडे (Shaheen Shah Afridi) आता कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी आली आहे. शाहीन आफ्रिदीला कर्णधार बनवल्याने या खेळाडूचा खेळ आणखी वाढेल, असा विश्वास लाहोर कलंदरचे प्रशिक्षक आकिब जावेद यांनी व्यक्त केला.

<div class="paragraphs"><p>Shaheen Shah Afridi&nbsp;</p></div>
पाकिस्तान क्रिकेटला 'अच्छे दिन'! हा परदेशी संघ येणार दौऱ्यावर

दरम्यान, शाहीन आफ्रिदीसाठी कर्णधारपद काही नवीन नाही. गेल्या मोसमात तो सोहेल अख्तरचा उपकर्णधार होता. म्हणजे गेल्या मोसमात शाहीन लाहोर कलंदरचा उपकर्णधार होता. शाहीनने लाहोर कलंदरसाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. तो संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज असून त्याने 37 पीएसएल सामन्यांमध्ये 50 बळी घेतले आहेत.

शिवाय, शाहीन आफ्रिदीचा लौकिक जागतिक क्रिकेटमध्येही खूप वाढला आहे. शाहीन कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रमवारीत शाहीन 13 व्या तर टी20 मध्ये 11व्या क्रमांकावर आहे. अलीकडेच, शाहीन आफ्रिदीने टी-20 विश्वचषकात (T20 World Cup) अप्रतिम कामगिरी केली. विशेषत: भारताविरुद्ध आफ्रिदीला 3 बळी घेऊन सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

PSL 2022 साठी लाहोर कलंदरचा संघ: शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), राशिद खान, डेव्हिड व्हिसा, हरिस रौफ, मोहम्मद हाफीज, सोहेल अख्तर, झीशान अश्रफ, अहमद डॅनियल, फखर जमान, फिल सॉल्ट, हॅरी ब्रुक, अब्दुल्ला शफीक, कामरान गुलाम, डीन फॉक्सक्रॉफ्ट, जमान खान, माझ खान, समित पटेल आणि सय्यद फरीदौन.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com