अखेर वादळ शमलं! कसोटी पाठोपाठ David Warner चा एकदिवसीय क्रिकेटलाही अलविदा

David Warner Retirement: एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी शतके झळकावण्याच्या बाबतीत तो रिकी पाँटिंगनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 111 कसोटी आणि 99 टी-20 सामनेही खेळले आहेत.
David Warner Retirement
David Warner RetirementDainik Gomantak
Published on
Updated on

Finally the storm subsided! David Warner bids farewell to ODI cricket after Tests:

ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तानसोबत तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. तिसरा कसोटी सामना ३ जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे.

दरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता त्याने एकदिवसीय फॉरमॅटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच त्याने हा मोठा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

सिडनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत डेव्हिड वॉर्नर भावूक झाला आणि म्हणाला की, मी निश्चितपणे एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत आहे. हे मी विश्वचषकादरम्यान सांगितले होते. भारतात एकदिवसीय विश्वचषक जिंकणे ही मोठी कामगिरी आहे. म्हणून मी आज त्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मला जगभरातील इतर लीगमध्ये खेळता येईल आणि एकदिवसीय संघाला थोडासा वाढण्यास मदत होईल.

पण वॉर्नरने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्याचे दरवाजे खुले ठेवले आहेत. तो म्हणाला की मला माहीत आहे की चॅम्पियन्स ट्रॉफी येत आहे. जर मी दोन वर्षात चांगले क्रिकेट खेळत असेल आणि त्यांना कोणाची गरज असेल तर मी उपलब्ध असेल.

David Warner Retirement
Rishabh Pant Accident: 'फोन आला अन् वाटलं पंत गेला...', अपघाताचं कळताच काय होत्या भावना, अक्षरचा खुलासा

डेव्हिड वॉर्नरने टी-20 क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकात खेळण्याची त्याच्याकडून पूर्ण आशा आहे.

पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर तो सिडनी थंडरसाठी किमान चार सामने खेळणार आहे. यानंतर तो ILT20 मध्ये दुबई कॅपिटल्सकडून खेळू शकतो.

ILT20 लीगमध्ये खेळण्यासाठी तो क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून NOC मागत आहे, ज्यामध्ये दुबई संघाचा पहिला सामना 21 जानेवारी रोजी होणार आहे.

David Warner Retirement
Rafael Nadal: पुनरागमनाच्या सामन्यात नदाल पराभूत! कोचसह वर्षभराने खेळला पहिला सामना, पाहा Video

डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियन संघासोबत 2015 आणि 2023 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. तो ऑस्ट्रेलियन संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळला आहे आणि त्याने संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत.

वॉर्नरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियासाठी 45.30 च्या सरासरीने 6932 धावा केल्या आहेत, ज्यात 22 शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा तो सहाव्या क्रमांकावर आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी शतके झळकावण्याच्या बाबतीत तो रिकी पाँटिंगनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 111 कसोटी आणि 99 टी-20 सामनेही खेळले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com