FIFA World Cup: 'गोल्डन बूट' पुरस्कार कोणी अन् कधी जिंकला; पाहा आत्तापर्यंतची संपूर्ण यादी

FIFA World Cup 2022: या पुरस्काराची अधिकृतपणे सुरुवात 1982 पासून झाली.
Cristiano Ronaldo
Cristiano RonaldoDainik Gomantak
Published on
Updated on

FIFA World Cup 2022: फिफा (FIFA) विश्वचषकात दिला जाणारा गोल्डन बूट पुरस्कार हा "प्लेअर ऑफ द सिरीज" सारखा असतो. जो संपूर्ण स्पर्धेदरम्यान सर्वोत्तम खेळाडूला दिला जातो. या पुरस्काराची अधिकृतरित्या सुरुवात 1982 पासून झाली. तेव्हापासून तो दरवर्षी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला दिलो जातो. 2006 पर्यंत तो ‘गोल्डन शू’ म्हणून ओळखला जात होता ही वेगळी बाब.

ज्याला गोल्डन बूट पुरस्कार मिळतो

स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट, तर दुसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला सिल्व्हर आणि तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या खेळाडूला ब्रॉन्झ बूट दिला जातो.

Cristiano Ronaldo
FIFA World Cup 2022: केवळ एकदा भारतीय संघ फिफा वर्ल्डकपसाठी ठरला पात्र; पण 'या' कारणामुळे हुकली संधी...

दुसरीकडे, पहिल्या फिफा विश्वचषकाबद्दल बोलायचे झाल्यास, हा पुरस्कार अर्जेंटिनाचा (Argentina) खेळाडू गिलेर्मो स्टॅबिले याला देण्यात आला. त्याने 8 गोल केले होते. गेल्या हंगामाविषयी म्हणजे 2018 विश्वचषकाबद्दल बोलायचे झाल्यास, इंग्लंडचा (England) कर्णधार हॅरी केनने हा पुरस्कार जिंकला. त्याने 6 गोल केले होते.

तसेच, विश्वचषकात सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूबद्दल बोलायचे झाल्यास, हा विक्रम फ्रान्सच्या (France) जस्ट फॉन्टेनच्या नावावर आहे ज्याने 13 गोल केले होते. कोणत्याही खेळाडूने हा पुरस्कार एकापेक्षा जास्त वेळा जिंकलेला नाही.

ज्या खेळाडूंनी आतापर्यंत गोल्डन बूट जिंकले

2018 फिफा विश्वचषक - हॅरी केन (इंग्लंड) - 6 गोल

2014 फिफा विश्वचषक - जेम्स रॉड्रिग्ज (कोलंबिया) - 6 गोल

2010 फिफा विश्वचषक - थॉमस मुलर (जर्मनी) - 6 गोल

2006 फिफा विश्वचषक - मिरोस्लाव क्लोस (जर्मनी) - 5 गोल

2002 फिफा विश्वचषक - रोनाल्डो नाराजियो (ब्राझील) - 8 गोल

Cristiano Ronaldo
FIFA World Cup कुठल्या देशाने कितीवेळा जिंकला?

1998 फिफा विश्वचषक - डेव्हर सुकर (क्रोएशिया) - 6 गोल

1994 फिफा विश्वचषक – ओलेग सालेंको (रशिया), ह्रिस्टो स्टोइचकोव्ह (बल्गेरिया) – 6 गोल

1990 फिफा विश्वचषक - साल्वाटोर सिल्लाची (इटली) - 6 गोल

1986 फिफा विश्वचषक - गॅरी लिनकर (इंग्लंड) - 6 गोल

1982 फिफा विश्वचषक – पाउलो रॉसी (इटली) – 6 गोल

1978 फिफा विश्वचषक - मारियो कॅम्प्स (अर्जेंटिना) - 6 गोल

1970 फिफा विश्वचषक - गेराड मुलर (जर्मनी) - 10 गोल

1974 फिफा विश्वचषक - ग्रेगॉर्ज लाटो (पोलंड) - 7 गोल

1966 फिफा विश्वचषक - इसेबियो (पोर्तुगाल) - 9 गोल

1962 फिफा विश्वचषक – फ्लोरियन अल्बर्ट (हंगेरी), व्हॅलेंटीन इव्हानोव (रशिया), गॅरिंचा आणि वावा (ब्राझील), ड्रॅसन जर्कोविक (क्रोएशिया), लिओनेल सांचेझ (चिली) – 4 गोल

Cristiano Ronaldo
FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्डकपचा 20 नोव्हेंबरपासून थरार; जाणून घ्या स्पर्धेविषयी सर्व काही...

1958 फिफा विश्वचषक – जस्ट फॉन्टेन (फ्रान्स) – 13 गोल

1954 फिफा विश्वचषक - सँडर कोसिस (हंगेरी) - 11 गोल

1950 फिफा विश्वचषक - अडेमिर (ब्राझी) - 8 गोल

1938 फिफा विश्वचषक - लिओनिदास (ब्राझील) - 7 गोल

1934 फिफा विश्वचषक - ओल्डरिच नेजदली (चेकोस्लोव्हाकिया) 5 गोल

1930 फिफा विश्वचषक - गुलेर्मो स्टेबिले (अर्जेंटिना) - 8 गोल

Cristiano Ronaldo
U-17 FIFA World Cup: नायजेरिया, कोलंबियास ऐतिहासिक संधी

यावेळी, 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान कतारमध्ये विश्वचषक खेळवला जाणार आहे. 18 नोव्हेंबरपासून 32 संघ जागतिक चॅम्पियन होण्यासाठी एकमेकांशी भिडतील. स्पर्धेचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी खेळवला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com