U-17 FIFA World Cup: नायजेरिया, कोलंबियास ऐतिहासिक संधी

जर्मनी विरुद्ध स्पेन उपांत्य लढतही रंगणार
FIFA U-17 Women's World Cup
FIFA U-17 Women's World CupDainik Gomantak

FIFA U-17 Women's World Cup : नायजेरिया व कोलंबियाने कधीही फिफा 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठलेली नाही. बुधवारी (ता. 26) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर यावेळच्या स्पर्धेत उभय संघांतील उपांत्य लढतीत विजय नोंदविणाऱ्या चमूला ऐतिहासिक संधी प्राप्त होईल.

FIFA U-17 Women's World Cup
Rishi Sunak Memes: ऋषी सुनक पंतप्रधान होताच आशिष नेहरा अन् कोहिनूर हिऱ्याची सोशल मीडियावर चलती

फातोर्ड्यातच स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना जर्मनी व स्पेन या युरोपीय संघात खेळला जाईल, जो रंगतदार होण्याचे संकेत आहेत. जर्मनी संघ युरोपियन विजेता असून स्पेन 2018 मधील स्पर्धेतील गतविजेते आहेत. जर्मनी सातव्यांदा विश्वकरंडक स्पर्धेत खेळत आहे, पण त्यांना यापूर्वी सहा स्पर्धांत अंतिम फेरी गाठता आलेली नाही. 2008 मध्ये तिसरा क्रमांक ही त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

स्पेनने उपांत्यपूर्व लढतीत 87 व्या मिनिटापर्यंत एका गोलने पिछाडीवर राहूनही जपानला 2-1 असे हरविले. उपांत्य फेरीत जागा मिळविताना जर्मनीने ब्राझीलला 2-0 असे नमविले. यावर्षी मे महिन्यात 17 वर्षांखालील महिला युरोपीयन स्पर्धेच्या अंतिम लढतीत पेनल्टींवर स्पेनला नमवून जर्मनीने विजेतेपद पटकावले होते.

आफ्रिकेतील नायजेरियाने सहाव्यांदा 17वर्षांखालील महिला विश्वकरंडक स्पर्धेची मुख्य फेरी गाठताना पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी 2010, 2012, 2014 मध्ये त्यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच आटोपले होते. यावेळी चुरशीच्या उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी 1-1 गोलबरोबरीनंतर बलाढ्य अमेरिकेस पेनल्टी शूटआऊटवर 4-3 फरकाने हरविले.

दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया संघ यापूर्वी चार वेळा स्पर्धेच्या साखळी फेरीतच गारद झाला होता. उपांत्यपूर्व लढतीत त्यांनी टांझानियास 3-0 असे पराजित केले. निलंबनामुळे बुधवारी कोलंबियास कार्ला विनाचा हिला मुकावे लागेल. यापूर्वी 17 वर्षांखालील महिला विश्वकरंडकाच्या साखळी फेरीतील दोन्ही लढतीत नायजेरियाने कोलंबियास हरविले आहे. नायजेरियाने 2012 मध्ये 3-0 असा, तर 2014 मध्ये 2-1असा विजय मिळविला होता.

FIFA U-17 Women's World Cup
Viral Video: और इनको कश्मीर चाहिए! देशाचा झेंडा उलटा धरलेला पाकिस्तानी चाहता झाला ट्रोल

लक्षवेधक खेळाडू

- कोलंबियाची कर्णधार लिंडा कायसेदो हिने स्पर्धेत आतापर्यंत संयुक्त सर्वाधिक चार गोल केले आहेत. जपानच्या मोमोको तानिकावा हिनेही तेवढेच गोल केले आहे, पण जपान संघ बाद झाल्यामुळे लिंडा हिला गोल्डन बूटची संधी आहे.

- नायजेरियाच्या मिरॅकल युसानी हिनेही लक्षवेधक खेळ केला असून आतापर्यंत तीन गोल नोंदविले आहेत.

- स्पेनची व्हिकी लोपेझ स्पर्धेतील धोकादायक खेळाडू ठरली आहे. जपानविरुद्ध तिने शेवटच्या तीन मिनिटांत दोन गोल केल्यामुळे गतविजेत्यांना आव्हान कायम राखता आले.

- जर्मनीने या स्पर्धेत आक्रमक खेळाचे शानदार प्रदर्शन करताना सर्वाधिक 13 गोल नोंदविले आहेत. त्यात लॉरीन बेंडर हिने तीन, तर मारी स्टेनर, अलारा सेहिटलर, मारा अल्बर यांनी प्रत्येकी दोन गोल केले आहेत.

उपांत्य फेरी (26 ऑक्टोबर)

स्थळ ः पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, फातोर्डा-गोवा

संध्याकाळी 4.30 वाजता ः नायजेरिया विरुद्ध कोलंबिया

रात्री 8 वाजता ः जर्मनी विरुद्ध स्पेन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com