गोमन्तक डिजिटल टीम
ब्राझिल
वर्ल्डकपमध्ये ब्राझिल हा संघ नेहमीच हॉट फेव्हरिट राहिला आहे. ब्राझिलने सर्वाधिक 5 वेळा फिफा वर्ल्डकपवर नाव कोरले आहे. 1958, 1962, 1970, 1994, 2002 या वर्षात ब्राझिल फुटबॉल वर्ल्डकपचा विजेता ठरला होता.
जर्मनी
ब्राझिल खालोखाल 4 वेळा वर्ल्डकप जिंकणारा संघ आहे जर्मनी. जर्मनीने 1954, 1974, 1990, 2014 या वर्षात वर्ल्डकप जिंकला होता.
इटली
जर्मनीसोबतच युरोपमधील इटली या संघानेही 4 वेळा फुटबॉल वर्ल्डकपवर मोहोर उमटवली आहे. 1934, 1938, 1982, 2006 या वर्षी इटलीने विश्वचषक जिंकला होता.
फ्रान्स
फ्रान्स संघाने 2 वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. 1998 आणि 2018 या वर्षी फ्रान्स फुटबॉलचा जगज्जेता ठरला होता.
उरुग्वे
उरुग्वे या दक्षिण अमेरिकन संघाने सर्वात पहिला म्हणजेच 1930 तसेच 1950 अशा दोन वर्षांमध्ये वर्ल्डकपवर नाव कोरले होते.
इंग्ंलड
इंग्लंड संघाने एकदाच 1966 मध्ये फुटबॉल वर्ल्डकप जिंकला होता.
स्पेन
2010 मध्ये स्पेनने वर्ल्डकप जिंकला होता.