T-20 World Cup 2021च्या थीम साँगवर कोरिओग्राफर धनश्री वर्माचा जबदस्त डान्स

या गाण्याचे नाव आहे #LiveTheGame. गाण्याच्या लाँचिंगच्या काही तासांतच प्रसिद्ध कोरिओग्राफर (Choreographer) आणि इंन्स्टाग्राम (Instagram) स्टार धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांनी टी 20 वर्ल्ड कपच्या थीम साँगवर नृत्य केले. तसेच तिच्या हा डान्स चाहत्यांना मैदानात करता याव यासाठी तिने चाहत्यांना मूव्स देखील शिकविल्या आहेत.
 प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि इंन्स्टाग्राम स्टार धनश्री वर्मा यांनी टी 20 वर्ल्ड कपच्या थीम साँगवर नृत्य केले.
प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि इंन्स्टाग्राम स्टार धनश्री वर्मा यांनी टी 20 वर्ल्ड कपच्या थीम साँगवर नृत्य केले.Dainik Gomantak

यूएई (UAE) आणि ओमानमध्ये होणाऱ्या टी 20 विश्वचषक (T20 World Cup 2021) चा काऊंटडाऊन सुरू झाले आहे. ही चॅम्पियनशिप (Championship) स्पर्धा दर 5 वर्षांनंतर आयोजित केली जाते. या आधी 2016 मध्ये T-20 World Cup खेळविण्यात आला होता, ज्यामध्ये वेस्ट इंडीज संघ चॅम्पियन बनला होता.

 प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि इंन्स्टाग्राम स्टार धनश्री वर्मा यांनी टी 20 वर्ल्ड कपच्या थीम साँगवर नृत्य केले.
T-20 World Cup नंतर 'हे' संघ येणार भारताच्या दौऱ्यावर

चाहत्यांमध्ये टी -20 विश्वचषकाचा उत्साह वाढवण्यासाठी आयसीसीने नुकतेच या स्पर्धेचे थीम साँगही लाँच केले आहे. या गाण्याचे नाव आहे #LiveTheGame. गाण्याच्या लाँचिंगच्या काही तासांतच प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि इंन्स्टाग्राम स्टार धनश्री वर्मा यांनी टी 20 वर्ल्ड कपच्या थीम साँगवर नृत्य केले. क्रिकेट चाहत्यांना स्पर्धेत सामील होण्यासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच, धनश्रीने चाहत्यांना डान्सच्या काही मूव्स शिकविल्या आहेत. या मूव्स प्रेक्षक सामना पाहताना मैदानात देखील करु शकतात.

युएई मध्ये होणार हा टी -20 विश्वचषक या आधी भारतात आयोजित करण्यात येणार होता परंतु कोरोनामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये याचे आयोजन करण्यात आले आहे. तेथे भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) आणि अमिरात क्रिकेट बोर्ड (ECB) संयुक्तपणे होस्ट करत आहे. चॅम्पियनशिप 17 ऑक्टोबर रोजी सुरू होईल, अंतिम सामना 14 नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com