IND vs ENG: यशस्वी जयस्वाल बनणार 'सिक्सर किंग'; बेन स्टोक्स आणि ब्रेंडन मॅक्युलमचा मोडणार रेकॉर्ड

Yashasvi Jaiswal: टीम इंडियाचा स्टार युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल हा इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
Yashasvi Jaiswal
Yashasvi JaiswalDainik Gomantak

Yashasvi Jaiswal: टीम इंडियाचा स्टार युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल हा इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. मालिकेत द्विशतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध दोनदा द्विशतक ठोकले आहे. या चार सामन्यांमध्ये यशस्वीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले असून मालिकेतील शेवटच्या सामन्यादरम्यान तो आणखी एक मोठी कामगिरी करण्याच्या जवळ आहे.

दरम्यान, 22 वर्षीय यशस्वी कसोटी सामन्यांमध्ये एका कॅलेंडर वर्षात एका फलंदाजाने मारलेल्या सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडण्याच्या जवळ आहे. जयस्वालने 2024 मध्ये केवळ दोन महिन्यांत 23 षटकार मारले आहेत. टीम इंडिया यावर्षी आणखी कसोटी सामने खेळणार आहे, अशा परिस्थितीत तो आपल्या षटकारांची संख्या वाढवण्यात यशस्वी ठरेल. या यादीत यशस्वी जयस्वालच्या पुढे इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आहे, ज्याने 2014 मध्ये 33 षटकार ठोकले होते. कॅप्टन बेन स्टोक्सने 2022 मध्ये 26 षटकार मारले आहेत.

Yashasvi Jaiswal
IND Vs ENG: धरमशाला कसोटीपूर्वी टीम इंडियात बदल, बुमराह संघात परतला; अष्टपैलू खेळाडूला केलं रिलीज

दुसरीकडे, या यादीत यशस्वी जयस्वालने काही दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ॲडम गिलख्रिस्टने 2005 मध्ये 22 षटकार मारले होते. वीरेंद्र सेहवागने 2008 मध्ये 22 षटकार मारले होते तर भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज ऋषभ पंतने 2022 मध्ये 21 षटकार मारले होते.

Yashasvi Jaiswal
IND vs ENG 5th Test: शेवटच्या कसोटीत रोहितच्या निशाण्यावर 2 मोठे रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला खेळाडू

तसेच, राजकोट कसोटीत यशस्वी जयस्वालने दुसऱ्या डावात 12 षटकार ठोकले होते. त्याने पाकिस्तानच्या वासिम अक्रमची बरोबरी केली, ज्याने 1996 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हा विक्रम केला होता. आठ कसोटी सामन्यांनंतर यशस्वी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत एकूण दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर भारतासाठी आठ कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आता यशस्वीच्या नावावर नोंदवला गेला आहे. यशस्वीने या बाबतीत सुनील गावस्कर, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. यशस्वीने आठ कसोटी सामन्यांमध्ये 971 धावा केल्या आहेत, तर गावसकरने कारकिर्दीतील पहिल्या आठ कसोटी सामन्यांमध्ये 938 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com