IND vs ENG: टीम इंडियाला मायदेशात रोखण्यासाठी इंग्लंड वापरणार 'ही' रणनीती, अँडरसनने दिले संकेत

Jame Anderson: इंग्लंडचा संघ भारतात जानेवारीच्या अखेरीस कसोटी मालिका खेळण्यासाठी येणार आहे, या कसोटी मालिकेआधी जेम्स अँडरसनने प्रतिक्रिया दिली आहे.
James Anderson
James AndersonDainik Gomantak

India vs England, Test Series, James Anderson:

इंग्लंडला संघ लवकरच भारताचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात इंग्लंडला भारताविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी इंग्डंल संघात दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडसनचाही समावेश आहे.

दरम्यान, अँडरसनने भारताविरुद्ध कोणती रणनीती इंग्लंड वापरू शकतात, याबद्दल संकेत दिले आहेत. अँडरसनने संकेत दिले आहेत की कदाचीत गोलंदाजी काही प्रयोग भारताविरुद्ध केले जाऊ शकतात.

41 वर्षीय अँडरसनने त्याच्या संघातील भूमिकेबद्दलही भाष्य केले असून त्याने सांगितले की संघातील अन्य युवा गोलंदाजांना मार्गदर्शन करण्याची त्याची भूमिका असणार आहे.

James Anderson
Ind vs Eng: अवघ्या 10 विकेट्सची गरज... अश्विन आणि अँडरसन रचणार इतिहास; भारत-इंग्लंड मालिकेत मोठ्या रेकॉर्डची प्रतिक्षा

द टेलिग्राफशी बोलताना अँडरसन म्हणाला, 'गेल्या काही वर्षात माझी हीच भूमिका राहिली आहे. संघातील वरिष्ठ खेळाडू म्हणून मार्गदर्शन करण्याची भूमिका आहे. अन्य खेळाडूंला माझ्याकडे असलेली माहिती पुरवणे ही माझी जबाबदारी आहे.'

याशिवाय अँडरसनने असेही म्हटले की या मालिकेत रिव्हर्स स्विंग महत्त्वाची ठरू शकते. त्याचबरोबर इंग्लंड दोन फिरकी गोलंदाजांसह डावात गोलंदाजीची सुरुवातही करू शकतात.

तो म्हणाला, 'रिव्हर्स स्विंग महत्त्वाची भूमिका बजावेल. कदाचीत अशीही परिस्थिती असेल, जेव्हा आम्ही वेगवान गोलंदाजासह गोलंदाजीची सुरुवात करणार नाही, तर कदाचीत आम्ही दोन फिरकी गोलंदाजांसह सुरुवात करू. त्यावेळी तुमची भूमिका कदाचीत बदलू शकते. तुम्ही फलंदाज कोणते आहेत, त्यानुसार गोलंदाजीतील तिसरा किंवा चौथा बदल असू शकता. हेच भारतात खेळण्याचे आव्हान आहे.'

James Anderson
Ind vs Eng: जो रुटच्या निशाण्यावर मास्टर ब्लास्टरचा रेकॉर्ड; पहिल्याच कसोटीत सामन्यात...

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून अँडरसनची साथ देणाऱ्या स्टुअर्ट ब्रॉडने काही महिन्यांपूर्वी निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे अँडरसनच्या निवृत्तीचीही सातत्याने चर्चा होत असते. मात्र, अँडरसनने निवृत्तीची शक्यता फेटाळली आहे.

तो म्हणाला, 'मला असे वाटते अद्यापही संघासाठी मी योगदान देऊ शकतो. जर मला तसे वाटले नसले, तर मी जे करत आहे, ते मी केले नसते.'

अँडरसनने आत्तापर्यंत 182 कसोटी सामने खेळले असून 690 विकेट्स घेतल्या आहेत.

भारत विरुद्ध इंग्लंड, कसोटी मालिकेचे वेळापत्रक

  • 25 ते 29 जानेवारी - पहिली कसोटी, मोहाली (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 2 ते 6 फेब्रुवारी - दुसरी कसोटी, विशाखापट्टणम (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 15 ते 19 फेब्रुवारी - तिसरी कसोटी, राजकोट (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 23 ते 27 फेब्रुवारी - चौथी कसोटी, रांची (वेळ: स. 9.30 वाजता)

  • 7 ते 11 मार्च - पाचवी कसोटी, धरमशाला (वेळ: स. 9.30 वाजता)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com