Ashes 2023: बेअरस्टोच्या विकेटने गदारोळ! स्टोक्स म्हणाला 'असं जिंकलो नसतो', तर कमिन्सला आठवला 'तो' वादग्रस्त कॅच

Bairstow Run-Out: लॉर्ड्स कसोटीत बेअरस्टोला दिलेल्या धावबादच्या निर्णयावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारांनी परस्परविरोधी प्रतिक्रिया दिली आहे.
Pat Cummins | Ben Stokes | Jonny Bairstow Run out
Pat Cummins | Ben Stokes | Jonny Bairstow Run outDainik Gomantak

Pat Cummins and Ben Stokes React on Jonny Bairstow Run Out: रविवारी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर रोमांचक झालेल्या ऍशेस 2023 कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 43 धावांनी पराभूत केले. पण या सामन्यात इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोला ज्याप्रकारे धावबाद देण्यात आले, ज्यावरून बरीच चर्चा रंगली. दरम्यान, सामन्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनीही परस्पर विरोधी प्रतिक्रिया दिली आहे.

झाले असे की इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 371 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून 52 वे षटक कॅमेरॉन ग्रीनने टाकले. त्याने टाकलेल्या या षटकातील एक आखुड टप्प्याचा चेंडू बेअरस्टोने सोडून दिला.

त्यामुळे चेंडू मागे यष्टीरक्षण करणाऱ्या ऍलेक्स कॅरेकडे गेला. पण चेंडू कॅरेकडे गेला तेव्हा बेअरस्टोने फक्त पाय खाली घासला आणि तो चेंडू पूर्ण झाला की नाही हे लक्षात न घेता पुढे निघून गेला. याचा फायदा उचलत कॅरेने चेंडू स्टंपवर फेकला.

त्यामुळे बेअरस्टोला पंचाकडून 10 धावांवर असताना नियमानुसार बाद देण्यात आले. त्याला याप्रकारे बाद देण्यात आल्याने अनेकांनी ऑस्ट्रेलियाच्या खेळभावनेवर टीका केली आहे. तर काहींनी नियम हा नियमच असतो असे म्हटले आहे.

Pat Cummins | Ben Stokes | Jonny Bairstow Run out
Bairstow Run-Out: "...त्यापेक्षा स्मार्टनेसचं कौतुक करा", बेअरस्टोच्या वादग्रस्त रनआऊटच्या चर्चेत अश्विनचीही उडी

दरम्यान, ही विकेट ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची ठरली. पण या घटनेवर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने एकमेकांच्या विरुद्ध मतं मांडली.

बेअरस्टोच्या विकेटबद्दल स्टोक्स सामन्यानंतर म्हणाला, 'जर शूज दुसऱ्या पायात असता (जर ऑस्ट्रेलियन फलंदाज बाद असता), तर मी पंचांवर अधिक दबाव टाकला असता की त्यांनी षटक संपवले आहे आणि खेळभावनेबद्दल सखोलतेने विचार केला असता,तसेच स्वत:ला विचारले असते की खरंच मला असे काही करायचे आहे? जॉनी क्रिजमध्ये होता, नंतर तो चर्चा करण्यासाठी क्रिज सोडून आला.

स्टोक्स असेही म्हणाला, 'मी या तथ्यावर चर्चा करणार नाही की तो बाद आहे करी नाही, कारण तो बाद आहे, पण मला अशाप्रकारे सामना जिंकायचा आहे का? तर माझे उत्तर नाही असे असेल.'

Pat Cummins | Ben Stokes | Jonny Bairstow Run out
Ashes 2023: गिल आऊट, पण डकेट नॉटआऊट! स्टार्कच्या कॅचवर चर्चांना उधाण, पण नियम काय सांगतो?

तसेच पॅट कमिन्सने प्रतिक्रिया दिली की 'मला वाटते कॅरेने यापूर्वी काही चेंडू पाहिले होते. तिथे कोणताही पॉज नव्हता. त्याने झेल घेतला आणि तो चेंडू फेकला. मला वाटते, ते पूर्णपणे योग्यच होते. तसाच नियम आहे. मला माहित आहे, काही लोक यावर सहमत नसतील. पण कालच्या झेलप्रमाणेच हा पण नियम आहे आणि मी असेच पाहातो.'

दरम्यान कमिन्सने प्रतिक्रिया देताना मिचेल स्टार्कने घेतलेल्या झेलवर बेन डकेटला नाबाद करार देण्यात आल्याचीही आठवण करू दिली. स्टार्कच्या त्या झेलावरही बरीच चर्चा झाली होती.

झाले असे की दुसऱ्याच डावात ग्रीननेच गोलंदाजी केलेल्या 29 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर डकेटने फाईन लेगला मोठा फटका खेळला. पण स्टार्कने सूर मारत जमीनीलगत झेल घेतला. त्यामुळे मैदानातील पंचांनी डकेटला बाद दिले होते. मात्र, काही वेळातच परत जात असलेल्या डकेटला थांबवण्यात आले.

स्टार्कचा झेल तिसऱ्या पंचांकडून तपासण्यात आला. त्यावेळी रिप्लेमध्ये स्टार्कने झेल घेतल्यानंतर तो जमीनीला टेकल्याचे दिसले. त्यामुळे तिसऱ्या पंचांनी डकेटला नाबाद दिले आणि डकेटला जीवदान मिळाले. या निर्णयावरही क्रिकेटविश्वात बरीच चर्चा झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com