Ashes 2023: 'याचसाठी तू आठवणीत राहशील...' बेअरस्टोच्या विकेटवर चिडलेल्या ब्रॉडनं लाईव्ह सामन्यात कॅरेला सुनावलं

Video: लॉर्ड्स कसोटीतील बेअरस्टोची विकेट गेल्यानंतर ब्रॉडने ऑस्ट्रेलियन खेळाडूंविरुद्ध स्लेजिंग केली होती.
Stuart Broad
Stuart BroadDainik Gomantak
Published on
Updated on

Stuart Broad Sledge Alex Carey and Pat Cummins: ऍशेस 2023 मालिकेतील लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध 43 धावांनी विजय मिळवला. याबरोबरच 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. दरम्यान, या सामन्यात इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोच्या विकेटने मोठा वाद निर्माण झाला आहे.

या सामन्यात दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरॉन ग्रीनने टाकलेल्या 52 व्या षटकातील एक चेंडू सोडल्यानंतर बेअरस्टोने पाय खाली घासला आणि तो चेंडू पूर्ण झाला की नाही हे लक्षात न घेता पुढे निघून गेला.

याचा फायदा उचलत यष्टीरक्षक ऍलेक्स कॅरेने चेंडू स्टंपवर फेकला. त्यामुळे बेअरस्टोला पंचाकडून 10 धावांवर असताना नियमानुसार बाद देण्यात आले. त्याला ज्या प्रकारे बाद देण्यात आले, त्यावरून बराच गदारोळ झाला.

Stuart Broad
Ashes 2023: बेअरस्टोच्या विकेटने गदारोळ! स्टोक्स म्हणाला 'असं जिंकलो नसतो', तर कमिन्सला आठवला 'तो' वादग्रस्त कॅच

दरम्यान, बेअरस्टो बाद झाल्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड फलंदाजीला उतरला. त्यावेळी दुसऱ्या बाजूने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स फलंदाजी करत होता. ब्रॉडने बेअरस्टोच्या विकेटचा राग फलंदाजी करताना त्याच्या कृतीतून व्यक्त केला. दरम्यान, त्याने याबद्दल कॅरीलाही ऐकवले. यादरम्यानचा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला. या घटनेचा व्हडिओही व्हायरल झाला आहे.

ब्रॉडने जोपर्यंत फलंदाजी करत होता, तोपर्यंत तो प्रत्येकवेळी क्रिजमध्ये बॅट ठोकताना दिसला होता. यातून तो बेअरस्टोबरोबर जे झाले, त्याची आठवण ऑस्ट्रेलियन संघाला करून देत होता, त्याचबरोबर तो एकदा कॅरीला म्हणाला, 'याच गोष्टीसाठी तुला नेहमी आठवणीत ठेवले जाईल.'

तसेच तो ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सलाही म्हणाला, 'मी क्रिकेटमध्ये यापेक्षा वाईट गोष्ट कधी पाहिली नाही.'

Stuart Broad
Lords Ashes Test: वाद संपता संपेना! लॉर्ड्सवर ख्वाजा-वॉर्नर MCC सदस्यांशी भिडले, तिघांचं निलंबन

ब्रॉडने स्टोक्सबरोबर 108 धावांची भागीदारी केली. पण स्टोक्स 155 धावांवर बाद झाला. त्यानंतर ब्रॉडही 11 धावांवर बाद झाला. यानंतर 371 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात 81.3 षटकात 327 धावांवर सर्वबाद झाला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 100.4 षटकात सर्वबाद 416 धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडला पहिल्या डावात 76.2 षटकात सर्वबाद 325 धावाच करता आल्या.

ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 101.5 षटकात सर्वबाद 279 धावा करता आल्या. तसेच त्यांनी पहिल्या डावात घेतलेल्या 91 धावांच्या आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी 371 धावांचे आव्हान ठेवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com