Ashes 2023: ख्वाजाविरुद्ध अपशब्द वापरत सेंड-ऑफ दिल्याबद्दल रॉबिन्सन म्हणतोय, 'सर्वांना हेच हवंय...'

पहिल्या ऍशेस सामन्यात शतक केलेल्या ख्वाजाला बाद केल्यानंतर रॉबिन्सनने अपशब्द वापरत जोरदार सेलिब्रशन केले होते.
Ollie Robinson | Usman Khawaja
Ollie Robinson | Usman KhawajaDainik Gomantak
Published on
Updated on

Ollie Robinson open up on his send-off to Usman Khawaja: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात सध्या ५ कसोटी सामन्यांची ऍशेस मालिका सुरू आहे. दोन्ही संघ विजयासाठी एकमेकांना तगडी लढत देत आहेत. दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये चूरसही दिसत आहे.दरम्यान, या सामन्यात ऑली रॉबिन्सनने उस्मान ख्वाजाला बाद केल्यानंतर केलेल्या कृतीबद्दल बरीच चर्चा झाली होती. याबद्दल त्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

या सामन्यात इंग्लंडने पहिला डाव ८ बाद ३९३ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सुरुवातीला लवकर विकेट्स गमावल्या. मात्र सलामीवीर उस्मान ख्वाजाने खेळपट्टीवर टिकून राहात पहिला डाव सांभाळला. त्याने शतकी खेळीही केली.

अखेर त्याला बाद करण्यासाठी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला क्षेत्ररक्षणात बदल करत योजना आखावी लागली. त्याने असे क्षेत्ररक्षण लावले, ज्यामुळे ख्वाजाला पुढून घेरले. अखेर ११३ व्या षटकात ख्वाजाला रॉबिन्सनने त्रिफळाची केले. त्यामुळे ३२१ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांसह १४१ धावा करत ख्वाजा माघारी परतला.

Ollie Robinson | Usman Khawaja
Ashes 2023 Fielding Setup: स्मिथला मागं, तर ख्वाजाला पुढं घेरलं! स्टोक्सची फिल्डींग पाहून ऑसी दिग्गजही गडबडले

पण जेव्हा रॉबिन्सनने ख्वाजाला बाद केले, तेव्हा अपशब्द वापरले होते. तसेच जोरदार सेलिब्रेशन केले होते. ज्यावर अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती. पण रॉबिन्सनने म्हटले आहे की त्याला याबाबत पश्चाताप झालेला नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनीही यापूर्वी असे केले आहे.

रॉबिन्सन म्हणाला, 'ही माझी मायदेशातील पहिली ऍशेस मालिका आहे. त्यावेळी माझ्यासाठी विकेट मिळवणे खास होते. मला वाटते की उस्मान ख्वाजाने शानदार खेळी केली. त्यावेळी त्याची विकेट एक संघ म्हणून आमच्यासाठी खूप खास होती.'

'आपल्या सर्वांनाच अशाप्रकारचा खेळ पाहायची इच्छा आहे, असे आहे की नाही? मला वाटत नाही, यात काही चूकीचे आहे. अनेकदा तुम्ही भावनेच्या भरात तुम्ही अशा गोष्टी करता. आपण सर्वांनी रिकी पाँटिंगला पाहिले आहे.'

Ollie Robinson | Usman Khawaja
Moeen Ali: ऍशेसमध्ये मोईनचं कमबॅक, पण बर्थडेलाच ICC कडून मोठी कारवाई, वाचा काय झाली चूक

रॉबिन्सन पुढे म्हणाला, 'बाकी ऑस्ट्रेलियाई खेळाडूही असे करतात. बस यावेळी इतकेच घडले की त्यांच्याबरोबर दुसऱ्या कोणीतरी अशी गोष्ट केली, जी त्यांना टोचत आहे. मला फरक पडत नाही की माझ्या सेलिब्रेशनकडे लोक कसे पाहातात. खरं सांगू तर ही ऍशेस आहे, हा प्रोफेशनल खेळ आहे, जर तुम्ही या गोष्टी सांभाळू शकत नसाल, तर तुम्ही काय सांभाळणार आहात?'

दरम्यान, ख्वाजाच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात सर्वबाद ३८६ धावा करता आल्या. त्यामुळे त्यांना ७ धावांची पिछाडी स्विकारावी लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com