IND vs ENG: चौथ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल, 'या' दोन गोलंदाजांना वगळलं

England Playing XI for 4th Test against India:भारताविरुद्ध रांचीमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने प्लेइंग-11 जाहीर केली असून दोन मोठे बदल केले आहेत.
England Cricket Team
England Cricket TeamX/englandcricket
Published on
Updated on

England Announced Playing XI against India for 4th Test in Ranchi:

भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्याला शुक्रवारपासून (23 फेब्रुवारी) रांचीमध्ये सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी एक दिवसआधीच इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे.

चौथ्या कसोटीसाठी निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये शोएब बशीर आणि ऑली रॉबिन्सन यांचे पुनरागमन झाले आहे. त्यांना मार्क वूड आणि रेहान अहमद यांच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.

England Cricket Team
IND vs ENG: जडेजाने गाजवलं घरचं मैदान! शतक अन् पाच विकेट्स घेत केला मोठा पराक्रम

मार्क वूड आणि रेहान अहमद यांची फारशी चांगली कामगिरी झालेली नाही. दरम्यान, अष्टपैलू रॉबिन्सनचे 7 महिन्यांनंतर इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे. त्याने अखेरचा कसोटी सामना जुलै 2023 मध्ये खेळला होता.

त्याचबरोबर बशीरने विशाखापट्टणमला झालेल्या भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून पदार्पण केले होते. मात्र, तिसऱ्या सामन्यातून त्याला वगळण्यात आले होते, आता पुन्हा त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

रांची कसोटीसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन -

झॅक क्रावली, बेन डकेट, ऑली पॉप, जो रुट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स, टॉम हर्टली, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, शोएब बशीर

England Cricket Team
IND Vs ENG Test: भारत-इंग्लंड कसोटीवर दहशतीचे सावट; गुरपतवंत सिंग पन्नूने दिली सामना रद्द करण्याची धमकी

इंग्लंड मालिकेत पिछाडीवर

सध्या या मालिकेतील तीन सामने पूर्ण झाले आहेत. या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने आघाडी घेतली होती. मात्र नंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत दुसरा आणि तिसरा कसोटी सामना जिंकला. त्यामुळे सध्या तीन सामन्यांनंतर भारताने 2-1 अशी आघाडी या मालिकेत घेतली आहे.

त्याचमुळे जर रांची कसोटी जिंकून भारताला मालिका खिशात घालण्याची संधी आहे. तसेच इंग्लंड संघही मालिकेत आव्हान राखण्यासाठी या सामन्यात विजय मिळवण्याच्या हेतूने उतरेल. जर इंग्लंडने रांची कसोटी जिंकली, तर मालिकेत 2-2 अशी बरोबरी होईल आणि नंतर धरमशाला येथे होणारा पाचवा कसोटी सामना निर्णायक ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com